Swapnil Lonkar च्या कुटुंबीयांचं 20 लाखांचं कर्ज भाजपने फेडलं
एमपीएससी (MPSC) ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) या 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले गेले. तसंच स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी पत्रात मांडलेली त्याची व्यथा प्रकाशझोतात आली आणि त्याच्यावर कर्ज असल्याचे उघड झाले. आता भाजपने स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांवरील कर्जाचा […]
ADVERTISEMENT
एमपीएससी (MPSC) ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) या 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले गेले. तसंच स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी पत्रात मांडलेली त्याची व्यथा प्रकाशझोतात आली आणि त्याच्यावर कर्ज असल्याचे उघड झाले. आता भाजपने स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांवरील कर्जाचा भार हलका केला आहे. लोणकर कुटुंबीयांवर असलेले 19.96 लाखांचे कर्ज भाजपने फेडले आहे.
ADVERTISEMENT
19 लाख 96 हजार 965 रुपयांचा धनादेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लोणकर कुटुंबियांना सुपूर्द केला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली.
काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
हे वाचलं का?
‘एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्त्या खोळंबल्याप्रश्नी स्वत:चे जीवन संपविणार्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर एका पतसंस्थेच्या असलेल्या 19.96 लाख रूपयांच्या थकित कर्जाची परतफेड करण्यासाठी त्या रकमेचा धनादेश आज त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केला. मुलगा गमाविल्याचे दु:ख तर कुणी भरून काढू शकत नाही. पण, भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा एक छोटासा प्रयत्न.या संकटात थकलेले हप्ते, कर्जाचा तगादा त्या कुटुंबाला अस्वस्थ करीत होता. भविष्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वप्निलच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील.स्वप्नील लोणकरचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांना याबाबत आश्वस्त केले. याप्रसंगी माझे सहकारी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.’
काय आहे स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरण?
ADVERTISEMENT
4 जुलैला पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरूणाने आत्महत्या केली. MPSC ची परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्याने त्याने नैराश्यातून हे पाऊल उचललं.
ADVERTISEMENT
‘MPSC हे मायजाल आहे यात पडू नका ! येणार्या प्रत्येक दिवसा सोबत वय आणि ओझं वाढत जातं. Confidence तळाला पोहोचतो आणि self doubt वाढत जातो. 2 वर्षे झालेत pass out होऊन आणि 24 वय संपत आलंय, घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेल कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! कोरोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं अशी सुसाईड नोट लिहून स्वप्नीलने आयुष्य संपवलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT