Raj Kundra Pornography Case: मीडियाविरुद्ध Gag Order काढण्यास हायकोर्टाचा नकार

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

“मला शिल्पा शेट्टी यांच्याविषयी चिंता नाही, त्या स्वतःला सावरु शकतात. मला त्यांच्या लहान मुलांची चिंता आहे. प्रसारमाध्यमांमध्ये शेट्टींच्या खासगी आयुष्याबद्दल येणाऱ्या बातम्या या त्यांच्या मुलांच्या दृष्टीने चिंताजनक आहेत”, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती जस्टीस गौतम पटेल यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

ADVERTISEMENT

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.

पॉर्नोग्राफी व्हिडीओ प्रकरणात राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमं आणि यु-ट्यूब चॅनलवर शिल्पा शेट्टी आणि तिच्या परिवाराशी निगडीत काही गोष्टींचं वार्तांकन करण्यात आलं होतं. याविरुद्ध शिल्पा शेट्टीने हायकोर्टात धाव घेत प्रसारमाध्यमांविरुद्ध Gag Order काढली जावी अशी मागणी केली होती. आजच्या सुनावणी जस्टीस गौतम पटेल यांनी अशी ऑर्डर काढण्यास नकार दिला आहे. परंतू हायकोर्टाने या सुनावणी दरम्यान यु-ट्यूबवर अपलोड करण्यात आलेले ३ व्हिडीओ तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी हायकोर्टाने संबंधित व्यक्तींना असे व्हिडीओ परत अपलोड करणार नाही अशी हमी देण्यास सांगितलं आहे.

हे वाचलं का?

यावेळी हायकोर्टाने शिल्पा शेट्टीच्या वकीलांना Media House आणि News Bloggers यांच्यात फरक करण्याचा सल्ला दिला. “पारंपरिक प्रसारमाध्यमं आम्ही दिलेला सक्षम सल्ला आणि तर्क समजू शकतात. परंतू खासगी ब्लॉगर्स आणि व्लॉगर्सबद्दल आम्ही असं सांगू शकत नाही.” शिल्पा शेट्टीचे अभिनव चंद्रचूड यांनी हायकोर्टासमोर माहिती देताना, आतापर्यंत बहुतांश जणांनी आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचं मान्य केलं असल्याची माहिती दिली. शिल्पा शेट्टीने आपल्या याचिकेत आपल्या विषयी चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती देण्यापासून थांबवावं असे आदेश द्यावेत अशी मागणी केली होती.

Pornography case : राज कुंद्राची अखेर तुरूंगातून सुटका! न्यायालयालयाकडून मोठा दिलासा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT