चीनमध्ये मोठी दुर्घटना! १३३ प्रवाशांना घेऊन जाणार बोईंग 737 विमान कोसळलं
चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. चायना ईस्टर्न एअरलाईन्सचे एक प्रवासी विमान डोंगराळ भागात कोसळलं आहे. या विमानातून १३३ जण प्रवास करत होते. बोईंग ७३७ हे प्रवासी विमान कोसळ्याच्या वृत्ताला चीनच्या हवाई उड्डाण मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. विमानात १२३ प्रवासी, तर ९ कर्मचारी होते. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील चायना ईस्टर्न एअरलाईन्सचे बोईंग ७३७ हे […]
ADVERTISEMENT

चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. चायना ईस्टर्न एअरलाईन्सचे एक प्रवासी विमान डोंगराळ भागात कोसळलं आहे. या विमानातून १३३ जण प्रवास करत होते. बोईंग ७३७ हे प्रवासी विमान कोसळ्याच्या वृत्ताला चीनच्या हवाई उड्डाण मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. विमानात १२३ प्रवासी, तर ९ कर्मचारी होते.
रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील चायना ईस्टर्न एअरलाईन्सचे बोईंग ७३७ हे प्रवासी विमान कुलमिंग येथून गौंगझाऊकडे झेपावले होते. गौंगझाऊकडे जात असतानाच विमान गौंगझीच्या परिसरात दुर्घटनाग्रस्त झाले. विमान पर्वतीय भागात कोसळलं असून, दुर्घटनेनंतर अपघाताच्या ठिकाणी आग लागल्याचं दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार MU5735 हे विमान चीनच्या दक्षिण पश्चिमेकडील युन्नान प्रांतातील कुनमिंग शहरातील शांगशुई विमानतळावरून चीनमधील प्रमाणवेळेनुसार १.१५ वाजता आकाशात झेपावलं होतं. तीन वाजेपर्यंत हे विमान गौंगडोई प्रांतातील गौंगझाई येथे पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र, त्यापूर्वीच विमान दुर्घटनाग्रस्त झालं.