आता खऱ्या आयुष्यातही, तुझ्यात जीव रंगला! राणादा-पाठकबाईंचा साखरपुडा संपन्न
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर खऱ्या आयुष्यात एकत्र आले आहेत. टीव्हीवर गाजलेल्या राणादा आणि पाठक बाई यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. अक्षया देवधरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. झी मराठी वाहिनीवर राणादा आणि पाठक बाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. […]
ADVERTISEMENT
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर खऱ्या आयुष्यात एकत्र आले आहेत. टीव्हीवर गाजलेल्या राणादा आणि पाठक बाई यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. अक्षया देवधरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत.
ADVERTISEMENT
झी मराठी वाहिनीवर राणादा आणि पाठक बाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. ही मालिका संपल्यानंतरही हे दोन्ही कलाकार आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांशी संपर्कात असायचे. मध्यंतरी सोशल मीडियावर अक्षया आणि हार्दिक यांच्या रिलेशनशीपबद्दल चर्चा रंगली होती. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.
अक्षया देवधरही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेकदा ती आपल्या फोटोशूटमधले फोटो, मित्रपरिवारासोबत सहलीचे फोटो पोस्ट करत असते. तुझ्यात जीव रंगला ही मालिका आल्यानंतर अनेक प्रेक्षकांना राणादा आणि पाठकबाईंचं जमावं अशी इच्छा होती. आज दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन साखरपुड्याची माहिती देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT