अध्यक्ष महोदय तुमचं अभिनंदन! पण किती दिवस पदावर राहाल माहित नाही- सुनील प्रभू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची आज निवड झाली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतं मिळून विजयी झाले आहेत. विजयासाठी 145 मतांची गरज असताना राहुल यांना समर्थनार्थ 164 मते मिळाली. राहुल नार्वेकरांची (Rahul Narvekar) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी अभिनंदन केले. यामध्ये सुनील प्रभू यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

ADVERTISEMENT

सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी प्रतोद म्हणून काल आदेश दिला होता की शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी राजन साळवी यांना मतदान करावे. परंतु आज सभागृहात व्हीप नाकारत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी विरोधात मतदान केले.

जाणून घ्या सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या राहुल नार्वेकरांविषयी

हे वाचलं का?

सुनील प्रभू सभागृहात म्हणाले की शिवसेनेच्या 39 सदस्यांनी विरोधात मतदान केले आहे. त्यामुळे तुम्ही किती दिवस अध्यक्षपदावर राहाल माहित नाही. तरीही तुमचं अभिनंदन करतो असे सुनील प्रभू म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले ”अध्यक्ष महोदय आम्ही तुमच्याकडे कायदामंत्री म्हणून पाहात होतो, परंतु तुम्हाला विधानसभा अध्यक्ष केलं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री झालेले पाहून आम्ही आमचं दु:ख विसरलो आणि त्यांचं दु:ख जास्त झालं.” शिवसेनेच्या 14 आमदारांनी राजन साळवी यांना मतदान केले आहे. एकूण 107 सदस्यांनी राजन साळवी यांना मतदान केले आहे.

अजित पवारांची विधानसभेत फटकेबाजी

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं असंही अजित पवार म्हणाले, त्यांच्या तुफान फटकेबाजीने सभागृहात एकच हशा पिकला.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्तेतून बाहेर पडून आम्ही विरोधकांसोबत येत नवं सरकार स्थापन केलं. या राज्यात आता खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT