Rahul Gandhi: पंतप्रधान झालात तर, सर्वात आधी काय कराल? दिलं उत्तर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

if you will become pm what will you do first question to rahul gandhi: काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) आहेत. यात्रेदरम्यान ते सतत जाहीर सभा घेत असतात. भारत जोडो यात्रा ही देशातील वाढत्या द्वेष, भीती आणि हिंसाचाराच्या विरोधात आहे. एका जाहीर सभेवेळी राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

ADVERTISEMENT

एका पत्रकारने राहुल गांधींना असा प्रश्न विचारला ज्यामुळे सर्वांना धक्का बसला. तुम्ही पंतप्रधान झालात तर, सर्वात पहिलं काय कराल? असा हा प्रश्न होता. यावर राहुल गांधींनी अगदी नम्रपणे आणि हुशारीने उत्तर दिले. ते म्हणाले ‘पंतप्रधान झालो तर, सर्वात आधी मी तीन कामं करेन.’

राहुल गांधींना लग्नासाठी म्हणून कशी मुलगी हवीये?

हे वाचलं का?

राहुल गांधी पंतप्रधान झाले तर कोणती तीन कामं करणार?

शिक्षण व्यवस्थेत बदल घडवेन

राहुल गांधी म्हणतात, सर्वप्रथम मला देशात शिक्षणाची रचनेत बदल करायचे आहेत. आपली शिक्षण व्यवस्था नीट चालत नाही. ते मुलांना अजिबात शिक्षण दृष्टी देऊ शकत नाही. भारत जोडो यात्रेदरम्यान मी हजारो मुलांशी बोललो. सगळ्यांनी विचारलं कॉलेज संपवून काय करायचं? मला डॉक्टर, वकील, इंजिनीअर, पायलट, आयएएस अशीच उत्तरं मिळाली. ९९.९ टक्के मुलं हीच उत्तरं देत आहेत. म्हणजेच आपली शिक्षण व्यवस्था त्या मुलांना सांगत असते की या पाच गोष्टींशिवाय तुम्ही दुसरे काहीही करू शकत नाही.

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्राला निरोप : सीमेवरील शेवटच्या कॉर्नर सभेत राहुल गांधी भावूक

ADVERTISEMENT

कौशल्याविना रोजगार मिळणार नाही

तरुणांच्या कौशल्याचा आदर केल्याशिवाय त्यांना रोजगार देऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. मग तो कोणीही असो. सध्या ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांना आम्ही मदत करू शकत नाही आहोत. त्याचे कौशल्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.

ADVERTISEMENT

परराष्ट्र धोरण गोंधळात टाकणारे

राहुल गांधी म्हणाले, देशात बंधुता, एकता आणि प्रेमाची भावना पसरवायची आहे. देशाच्या सीमांवरही त्याचा परिणाम होतो. देशातील हिंसाचार आणि द्वेषाचा परिणाम इतर देश बघतात आणि त्याचा फायदा घेतात. आपले परराष्ट्र धोरण अतिशय गोंधळात टाकणारे आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान होईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT