कोल्हापूर : हाफ मॅरेथॉन प्रकरणाला धक्कादायक वळणं; आयोजक वैभव पाटीलची आत्महत्या

मुंबई तक

कोल्हापुर : हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली देशभरातील स्पर्धकांच्या फसवणूक प्रकरणाला धक्कादायक वळणं मिळालं आहे. या स्पर्धेचा आयोजक आणि संशयित आरोपी वैभव पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. रविवारी सकाळी पन्हाळा तालुक्यातील तिरपण गावात झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. पन्हाळा पोलीस घटनास्थळी पोहचले असून ते कसून तपास करतं आहेत. दरम्यान या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

कोल्हापुर : हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली देशभरातील स्पर्धकांच्या फसवणूक प्रकरणाला धक्कादायक वळणं मिळालं आहे. या स्पर्धेचा आयोजक आणि संशयित आरोपी वैभव पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. रविवारी सकाळी पन्हाळा तालुक्यातील तिरपण गावात झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. पन्हाळा पोलीस घटनास्थळी पोहचले असून ते कसून तपास करतं आहेत.

दरम्यान या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरमधील शाहूपुरी इथं वैभव पाटील यानं ‘मराठा कमांडो सिक्युरिटी इंटलिजेन्स मॅन पॉवर्स फोर्स’ कंपनीच्या नावे वेबसाईटवर हाफ मॅरेथॉनची माहिती टाकली होती. या जाहिरातीमध्ये एमसीएसएफ वेल्फअर फौंडेशन, कमांडो हाफ मॅरेथॉन २०२२ असा उल्लेख करण्यात आला होता. १६ ऑक्टोबर रोजी तपोवन इथून या स्पर्धेला सुरूवात होणार असल्याचंही म्हटलं होतं.

या जाहिरातीमध्ये स्पर्धेच्या नियम आणि अटींमध्ये २१, १०, ५ आणि ३ किलोमीटर या अंतराची स्पर्धा होणार असल्याचं सांगितलं होतं. तसंच सहभागी होण्यासाठी प्रत्येकी १५०० ते २ हजार रूपये फी आकारण्यात आली. जाहिरातीच्या शेवटी वेगवेगळया गटातील विजेत्यांना ३० लाख रूपयांची बक्षिसं दिली जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. आकर्षक बक्षिसाच्या रकमेमुळे जाहिरात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली.

या जाहिरातीवरुन महाराष्ट्राच्या विविध भागातील मॅरेथॉनपटूंसह दिल्ली, बिहार, हरियाणा, पंजाब, गुजरात, आसाम या राज्यातील मॅरेथॉनपटूंनी सहभाग घेतला.अशा प्रकारे जवळपास ९०० स्पर्धकांची नोंदणी या फौंडेशनकडं झाली. स्पर्धेच्या एक दिवस आधी स्पर्धक कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी राहण्यासाठी लॉज, यात्री निवास बुक केले. तसंच टाकाळा इथल्या व्ही.टी. पाटील सांस्कृतिक भवनाच्या मैदानावर हे स्पर्धक दिवसभर थांबून राहिले.

हे वाचलं का?