Maharashtra Bandh : “बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’!”

मुंबई तक

‘महाराष्ट्र बंद’वरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होताना दिसत आहे. आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदवरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Bandh) आशिष शेलार यांनी ट्वीट करत बंद हा महाविकास आघाडीचा धंदा असल्याची टीका केली आहे. “बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

‘महाराष्ट्र बंद’वरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होताना दिसत आहे. आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदवरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Bandh)

आशिष शेलार यांनी ट्वीट करत बंद हा महाविकास आघाडीचा धंदा असल्याची टीका केली आहे. “बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित “बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा… मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले”, असा आरोप शेलार यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

“एवढेच कशाला… आता सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय… कोस्टल रोडला विरोध… नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध… मेट्रोचेही हे विरोधकच… हे तर विकासातील गतीरोधक. बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’ गोळा होतो त्यावरच ‘चंदा’!”, अशी टीका शेलार यांनी केली.

“आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद ही तर तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी”चाल. आई दुर्गामाते जनतेला दे ‘बळ’! उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा ‘खेळ”, अशा शब्दा शेलार यांनी निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?