विधान परिषद निवडणूक : नागपुरात उमेदवारांच्या नावांबद्दल सस्पेन्स; भाजपा-काँग्रेसचं सावध पाऊल
–योगेश पांडे, नागपूर राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक होत असून, नागपुर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत विधान परिषदेचे आमदार गिरीश व्यास यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे. या जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांनी उमेदवारांबद्दल अजून कोणतीही वाच्यता केलेली नाही. गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता असल्यानं दोन्ही पक्षांनी […]
ADVERTISEMENT

–योगेश पांडे, नागपूर
राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक होत असून, नागपुर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत विधान परिषदेचे आमदार गिरीश व्यास यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे. या जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांनी उमेदवारांबद्दल अजून कोणतीही वाच्यता केलेली नाही. गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता असल्यानं दोन्ही पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे.
विधान परिषदेच्या या जागेसाठी नामांकन दाखल करण्यासाठी तीन दिवस राहिलेले आहेत. 23 नोव्हेंबर नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. काँग्रेसतर्फे जिल्हाप्रमुख राजेंद्र मुळक यांचे नाव सध्यातरी आघाडीवर आहेत.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये मात्र माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले विरेन्द्र कुकरेजा, संघ परिवारातील आणि विद्यमान भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, नागपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे या नेत्यांची नावं सध्या स्पर्धेत आहेत. भाजपातर्फे इतकी सर्व नावे आघाडीवर असण्याचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी लागणारं संख्याबळ भाजपाजवळ आहे.









