Vaccination in Maharashtra : राज्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या १ कोटींवर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरणामध्ये महाराष्ट्राने आज आणखी एक विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाच्या मोहीमेत सहभागी असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केलंय.

आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत राज्यात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे. लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे.

आतापर्यंत राज्यातील तीन कोटी १६ लाख ९ हजार २२७ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यात आज सुमारे ४१०० लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी ४ वाजेपर्यंत तीन लाख ७५ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.

२५ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्ह्यात लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक देण्यात आले हे पाहूयात –

ADVERTISEMENT

१) पुणे जिल्हा – २१ हजार ९२८ डोस

ADVERTISEMENT

२) ठाणे जिल्हा – १५ हजार ३२० डोस

३) सातारा – १४ हजार १७ डोस

४) मुंबई – १३ हजार १७० डोस

५) नागपूर – ८ हजार ९३० डोस

    follow whatsapp

    ADVERTISEMENT