समीर वानखेडे अडचणीत?; नवाब मलिकांनी बोगस जातप्रमाणपत्राबद्दल केला मोठा खुलासा
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहे. समीर वानखेडे यांनी जन्मदाखल्यात केलेली छेडछाड केल्याचा आरोप करत त्यांनी बोगस कागदपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवलं असल्याचं मलिक म्हणाले. मलिक यांनी यासंदर्भातील घटनाक्रम विशद केला. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत काही कागदपत्र दाखवत आणखी काही खुलासे केले. […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहे. समीर वानखेडे यांनी जन्मदाखल्यात केलेली छेडछाड केल्याचा आरोप करत त्यांनी बोगस कागदपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवलं असल्याचं मलिक म्हणाले. मलिक यांनी यासंदर्भातील घटनाक्रम विशद केला.
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत काही कागदपत्र दाखवत आणखी काही खुलासे केले. समीर वानखेडे सरकारी नोकरीत असतानाही व्यवसाय करत असल्याचा दावा मलिकांनी केला असून, अल्पवयीन असतानाच त्यांच्या नावे बार लायसन्स काढण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट मलिकांनी केला.
नवाब मलिक काय म्हणाले?
हे वाचलं का?
“समीर दाऊद वानखेडे यांचा जन्मदाखला आम्ही ट्विटरवर टाकला होता. त्यावर इथूनच फसवेगिरी सुरू झाल्याचं म्हटलं होतं. याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील न्यायालयात गेले. माझ्या बोलण्यावर बंधन आणून ट्वीट डिलीट करण्याची मागणी केली गेली. आम्ही न्यायालयात कागदपत्रं दाखल केली आहे. सोमवारी न्यायालय निकाल देणार आहे.”
“मजेची गोष्ट म्हणजे फसवेगिरी सुरू झाली, ती आणखीच बोगस गोष्टीपासून. नाव बदलल्याचं एक प्रतिज्ञापत्र १९९३ मध्ये महापालिकेसमोर सादर करण्यात करण्यात आलं. १९९३चं प्रतिज्ञापत्र दोन व्यक्तींनी दाखल केलं होतं. दाऊद वानखेडे नसून ज्ञानदेव वानखेडे असल्याचं त्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं गेलं. मग जन्मदाखल्यात चिन्हांकित करून बाजूला ज्ञानदेव लिहिलं गेलं.”
ADVERTISEMENT
“नवीन जन्मदाखला तयार झाला. सेंट पॉल शाळेतील दाखल्यावरही मुस्लीम असल्याचं आणि समीर दाऊद वानखेडे असल्याचं आम्ही समोर आणलं आहे. सेंट जोसेफ शाळेच्या दाखल्यावरही हेच नाव होतं. त्यानंतर सेंट जोसेफच्या टीसीवर नाव बदलण्यात आलं आणि ही फसवेगिरी करण्यात आली.”
ADVERTISEMENT
“बोगसगिरीच्या माध्यमातूनच महापालिका आणि शाळेतील नोंदी बदलण्यात आल्या. १९९५मध्ये मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला. वडिलांच्या जातीचं प्रमाणपत्र आणि छेडछाड करण्यात आलेला जन्मदाखला देण्यात आला. शाळेची जुनी टीसी न दाखवता सेंट जोसेफची दाखवण्यात आली आणि अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं”, असं मलिकांनी म्हटलं आहे.
“अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे कॉलेजमध्ये लाभ घेण्यात आला. समीर वानखेडेंबरोबर त्यांच्या बहिणीनेही याचा लाभ घेतला. त्यानंतर स्पर्धा परीक्षतेही याच प्रवर्गातून लाभ घेण्यात आला. त्याच आधारावर नोकरी मिळवली आहे. काही जणांनी तक्रारी दिल्या आहेत. चौकशी होईल. जातप्रमाणपत्र रद्द होईल आणि यांची (समीर वानखेडे) नोकरी जाईल”, असा दावा मलिकांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT