Omicron New Sub Variant चा चार आठवड्यात देशभरात फैलाव? लक्षणं काय?

मुंबई तक

दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. सगळा देश दिवाळीच्या सेलिब्रेशनसाठी सज्ज झाला आहे. अशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोना वाढू लागल्याने महाराष्ट्र, केरळ या राज्यांनी अॅडव्हायजरीही लागू केली आहे. तसंच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मागच्या दिवसांपासून वाढ पाहण्यास मिळते आहे. दिल्लीत १६ ऑक्टोबरला १.५९ पॉझिटिव्हिटी रेट सह ११५ नवे रूग्ण आढळले होते. तर शनिवारी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. सगळा देश दिवाळीच्या सेलिब्रेशनसाठी सज्ज झाला आहे. अशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोना वाढू लागल्याने महाराष्ट्र, केरळ या राज्यांनी अॅडव्हायजरीही लागू केली आहे. तसंच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मागच्या दिवसांपासून वाढ पाहण्यास मिळते आहे. दिल्लीत १६ ऑक्टोबरला १.५९ पॉझिटिव्हिटी रेट सह ११५ नवे रूग्ण आढळले होते. तर शनिवारी २.१२ पॉझिटिव्हिटी रेटसर १३५ नवे रूग्ण आढळले होते.

दिल्लीत ४२९ सक्रिय कोरोना रूग्ण

दिल्लीत सध्याच्या घडीला ४२९ सक्रिया कोरोना रूग्ण आहेत. त्यातले ३२९ रूग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. असं सगळं असतानाच कोरोनाचा नवा व्हेरिएंट भारतात आढळला आहे.याचा फैलाव देशभरात चार आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

काय आहे ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट?

ओमिक्रॉन या व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचं नाव BA.5.1.7 असं आहे. आरोग्य तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे की हा व्हेरिएंट गेल्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरणारा आहे. जर निष्काळजीपणा केला तर हा व्हेरिएंट वेगाने पसरू शकतो. तसंच या व्हेरिएंटचा फैलाव झाला तर कोरोनाचे रूग्ण वाढण्याची शक्यता आहे.

भारतात BF.7 हा व्हेरिएंट गुजरातमध्ये आढळला

गुजरातच्या बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये भारतातल्या BF.7 सब व्हेरिएंटचा शोध लागला. चीनमध्ये कोरोनाची जे रूग्ण वाढत आहेत त्याचं मुख्य कारण BF.7 आणि BA.5.1.7 हे दोन व्हेरिएंट आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि बेल्जियम या देशातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची प्रकरणं समोर आली आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp