NFL Recruitment : सरकारी नोकरी, पगारही चांगला... सुवर्णसंधीसाठी आजच करा अर्ज!
National Fertilizers Limited : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड येथे मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, आजपासूनच अर्ज करण्यात सुरूवात करू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 164 जागांसाठी नोकरीची संधी
NFL Recruitment 2024 : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (National Fertilizers Limited ) येथे मॅनेजमेंट ट्रेनी या पदावर करिअर संधी आहे. मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी केमिकल शाखेत 56 जागा, मेकॅनिकल शाखेत 18 जागा, इलेक्ट्रिकल शाखेत 21 जागा, इन्स्ट्रुमेंटेशन शाखेत 17 जागा, केमिकल लॅबमध्ये 12 जागा, सिव्हिल शाखेत 03 जागा, फायर सेफ्टीसाठी 05 जागा, IT क्षेत्रात 05 जागा, मटेरियलमध्ये 11 जागा तर HR पदासाठी 16 जागा अशा एकूण 164 जागांसाठी ही नोकरीची संधी आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 02 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. परीक्षेबद्दलची माहिती नंतर कळविण्यात येईल.
हेही वाचा : Maharashtra : शिंदेच्या आमदाराचा महायुतीलाच घरचा आहेर
शैक्षणिक पात्रता
- ६०% गुणांसह केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल/इन्स्ट्रुमेंटेशन अॅंड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ फायर अॅंड सेफ्टी/ फायर टेक्नॉलॉजी अॅंड सेफ्टी/ कॉम्प्युटर सायन्स/आयटी या क्षेत्रात बीटेक, B.E, बीएससी इंजिनीअरिंग असणे आवश्यक आहे.
- किंवा MCA/ MBA/ PG पदवी/ PG डिप्लोमा (PGDM/PGDBM) केलेला असावा.
हेही वाचा : 'तुम्ही दळिद्रीपणा करणार का?', फडणवीसांबद्दल बोलताना केतकीची घसरली जीभ
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी/इडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 700 रूपये शुल्क आकारले जाईल.
- तर, एससी/एसटी/ पीडब्ल्यूडी/इएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले नाही.
अधिक माहितीसाठी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.nationalfertilizers.com/ वरून माहिती मिळवू शकता.