पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहण्यास मिळेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य
पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहण्यास मिळेल असं अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे असंही वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. संत आणि ज्योतिषी यांच्या मते पुढच्या २० ते २५ वर्षात अखंड भारत होईल. मात्र आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर पुढच्या १५ वर्षांमध्ये अखंड […]
ADVERTISEMENT
पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहण्यास मिळेल असं अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे असंही वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. संत आणि ज्योतिषी यांच्या मते पुढच्या २० ते २५ वर्षात अखंड भारत होईल. मात्र आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर पुढच्या १५ वर्षांमध्ये अखंड भारत होईल असं मोहन भागवत यांनी हरिद्वारमध्ये म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
हिंदूंना हिंदू राहायचं असेल, तर भारताला अखंड बनवावंच लागेल -मोहन भागवत
मोहन भागवत यांनी हरिद्वार या ठिकाणी आल्यानंतत त्या ठिकाणी परमार्थ निकेतनचे चिदानंद सरस्वती यांनी भारतीय वेदांत संमेलनात मोहन भागवत यांची भेट घेतली. स्वामी चिदानंद सरस्वती यांनी मोहन भागवत यांना ३ जून रोजी परमार्थ निकेतन यांना आमंत्रित केलं आहे.
हे वाचलं का?
मोहन भागवत यांनी नेमकं काय म्हटलं आहे
ADVERTISEMENT
अखंड भारत हा अजेंडा कायमच महत्त्वाचा आहे. स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातला अखंड भारत १० ते १५ वर्षात होईल. यामध्ये कुणीही अडथळे आणू शकत नाही. जो या मार्गात येईल तो संपेल असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. आरएसएस प्रमुख म्हणाले की भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. अगदी त्याचप्रकारे संत आणि महंत यांच्या आशीर्वादाने लवकरच अखंड भारताची निर्मिती होईल. यामध्ये कुणीही अडथळे आणू शकत नाही. जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर १० ते १५ वर्षातच अखंड भारताची निर्मिती होईल.
ADVERTISEMENT
1930 पासून देशात Muslim समाजाची लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे, RSS प्रमुख मोहन भागवत यांचं वक्तव्य
मोहन भागवत म्हणाले की भारत आत्ता प्रगती पथावर आहे. या मार्गात जो कुणी येईल तो संपून जाईल. भारताची प्रगती होणार म्हणजे होणारच. मागच्या एक हजार वर्षांपासून भारतातला सनातन धर्म संपवण्यासाठीचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. मात्र आजही सनातन धर्म आहे. भारत हा जगातला असा देश आहे जिथे जगातल्या प्रत्येक व्यक्तीची दुष्ट प्रवृत्ती संपते. जो कुणी भारतात येतो तो दुष्ट प्रवृत्ती सोडून देतो किंवा स्वतःच संपतो. RSS चे प्रमुख मोहन भागवत यांनी हरिद्वारमध्ये कनखल संन्यास रोड भागात श्रीकृष्ण निवास आश्रम आणि पूर्णानंद आश्रम या ठिकाणी ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि गुरूत्रय मंदिराचं लोकार्पण केलं. याच कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मोहन भागवत यांचं हे वक्तव्य समोर आलेलं असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार ते संजय राऊत, सगळेच म्हणाले राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…..
काय म्हणाले संजय राऊत?
”अखंड भारताचं स्वप्न कुणीही पाहात असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करतो. कोणताच पक्ष या संकल्पनेला विरोध करणार नाही. २०१४, २०१९ मध्ये भाजपने याच मुद्द्यावर मतं मागितली. आधी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान ताब्यात घ्या आणि अखंड हिंदुस्थानची निर्मिती करा. तुम्हाला कुणीही थांबवलेलं नाही. त्याआधी वीर सावरकर यांना भारतरत्न द्या. कारण अखंड भारत हे त्यांचंही स्वप्न होतं.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT