उत्तर प्रदेशच्या राजकारणातले ‘नेताजी’ काळाच्या पडद्याआड, मुलायम सिंह यादव यांचं निधन
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे. प्रदीर्घ आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर दिल्लीतल्या मेदांता रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ‘नेताजी’ या नावाने ते प्रसिद्ध होते. मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होतो आहे. In a tweet, Samajwadi Party […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे. प्रदीर्घ आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर दिल्लीतल्या मेदांता रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ‘नेताजी’ या नावाने ते प्रसिद्ध होते. मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होतो आहे.
In a tweet, Samajwadi Party chief Akhilesh Yadav announces the passing away of his father and party supremo Mulayam Singh Yadav pic.twitter.com/P7EaxdJfPB
— ANI (@ANI) October 10, 2022
मुलायम सिंह यादव हे जेव्हा रूग्णालयात दाखल झाले होते तेव्हापासूनच त्यांना भेटण्यासाठी नेत्यांची रिघ लागली होती. रविवारी नेताजी मुलायम सिंह यादव यांची प्रकृती कशी आहे याची विचारपूस करण्यासाठी रघुराज प्रताप सिंह अर्था राजा भैय्याही मेदांता रूग्णालयात पोहचले होते. त्याआधी आपचे खासदार संजय सिंह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केली होती मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची चौकशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री ऱाजनाथ सिंह यांच्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अखिलेश यादव यांच्यासोबत संवाद साधून मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली होती. तसंच तुम्हाला जी मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत असंही आश्वासन दिलं होतं.
मुलायम सिंह यादव यांचा अल्प परिचय
मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ ला इटावा जिल्ह्यातील सैफई गावात झाला होता. त्यांचे वडील सुघर सिंह यादव हे शेतकरी होते. मुलायम सिंह यादव हे सध्याच्या घडीला मैनपुरी मतदारसंघातून खासदार आहेत. उत्तर प्रदेशातलं राजकारण असो किंवा देशातलं राजकारण असो मुलायम सिंह यादव यांना देशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये स्थान मिळालं होतं.