PM मोदींना माझी हात जोडून विनंती, कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर काढा : संभाजीराजे छत्रपती
परभणी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. यावरुनच आता संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढा असं म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काय म्हटलं? औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब […]
ADVERTISEMENT
परभणी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. यावरुनच आता संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढा असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काय म्हटलं?
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभ सुरु होता. त्यावेळी भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते नितीन गडकरी डीलिट ही पदवी देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक वक्तव्य केलं.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारत असत की तुमचा आवडता नेता कोण? कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी, कुणी पंडित नेहरूंचं नाव घ्यायचं. मला वाटतं आता हा प्रश्न आला की तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले झाले. मी आत्ताच्या काळात बोलत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत”
हे वाचलं का?
संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?
परभणीमध्ये बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मला कळत नाही, राज्यपाल असं का बडबडतात. परवा सुद्धा म्हटलं यांना बाहेर पाठवून द्या. मी तर हात पंतप्रधानांना विनंती करतो, प्लिज म्हणतोय मी, प्लिज, प्लिज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. जे महाराष्ट्राच वैभव, जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाकीचे महापुरुष असतील किंवा संतांची भुमी आहे, इथं एवढे घाणेरडे शब्द आणि घाणेरडा विचार घेऊन येऊ कसे शकतात? आणि यांना अजून राज्यपालपदी ठेवलचं कसं आहे?
संभाजी ब्रिगेडची राज्यपालांवर टीका
संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कोश्यारी हे महाराष्ट्र आणि शिवद्रोही असल्याचं म्हटलं. राज्यपाल महोदय, छत्रपती शिवाजी महाराज साडे तीनशे वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रत्येक माणसाच्या नसानसात भिनलेले आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही एकदा गडकिल्ले फिरा म्हणजे तुम्हाला कळेल. उगाच उठायचं अणि जीभ टाळला लावायची हे धंदे बंद करा, असं संतोष शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT