सातारा: वासनांध तरुण भररस्त्यात अचानक घालतो महिलेच्या कंबरेत हात अन्..
Satara Crime: सातारा: बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी एक तरुण थेट महिलांना पकडून त्यांना जबरदस्तीने किस (Kiss) करत असल्याची घटना उघडकीस आलेली असताना दुसरीकडे आता सातारा (Satara) शहरामध्येही असाच काहीसा किळसवाणा प्रकार घडला आहे. गेल्या महिन्याभरात साताऱ्यात दोन अशा अनपेक्षित घटना घडल्या की, शहरातून सायंकाळी फिरणाऱ्या महिलांच्या (Women) मनात आता भीती निर्माण होऊ लागली आहे. त्याचं कारण […]
ADVERTISEMENT

Satara Crime: सातारा: बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी एक तरुण थेट महिलांना पकडून त्यांना जबरदस्तीने किस (Kiss) करत असल्याची घटना उघडकीस आलेली असताना दुसरीकडे आता सातारा (Satara) शहरामध्येही असाच काहीसा किळसवाणा प्रकार घडला आहे. गेल्या महिन्याभरात साताऱ्यात दोन अशा अनपेक्षित घटना घडल्या की, शहरातून सायंकाळी फिरणाऱ्या महिलांच्या (Women) मनात आता भीती निर्माण होऊ लागली आहे. त्याचं कारण म्हणजे, अनोळखी महिलांना स्पर्श करण्यासाठी काही तरुणांचा हात निर्लज्जपणे पुढे सरसावत आहेत. वासनांध आरोपी त्याचे विकृत चाळे करण्यासाठी निर्जन ठिकाण पाहून महिलांना लक्ष्य बनवतो आहे. असाच धक्कादायक प्रकार दोन महिलांच्या बाबतीत नुकताच घडला आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (satara a lustful young man suddenly puts his hand on a womans waist in a street creating fear among women)
नेमकं प्रकरण काय?
सातारा शहर तसं पाहिलं तर महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानलं जातं. परंतु अलिकडे शहरामध्ये सातत्याने कुठे ना कुठे तरी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. यातील दोन घटनांनी मात्र शहरातील महिलांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.
मागील आठवड्यात एक नोकरदार महिला ऑफिसमधील आपले काम आटोपून रात्री आठ वाजता एकटीच दुचाकीवरून घरी निघाली होती. पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरमधून जात असताना एका अनोळखी विकृत व्यक्तीने पाळत ठेवून तिचा पाठलाग केला. दुचाकीस्वाराने ग्रेडसेपरेटरमधील शांतता, कमी वर्दळ पाहून अचानक दुचाकीवरूनच महिलेच्या कंबरेत हात घालून तिला गलिच्छ पद्धतीने स्पर्श केला.
अनपेक्षितरित्या घडलेल्या या घटनेने ती महिला भयभीत झाली. महिलेचा विनयभंग (molesting) केल्यानंतर वासनांध आरोपीने तिथून तात्काळ पळ काढला. अवघ्या काही क्षणातच हा संपूर्ण प्रकार घडला. ज्यामुळे महिला देखील भांबावून गेली.









