Nagaland येथील स्वयंसेवकाचा किस्सा सांगत शरद पवारांनी केलं RSS चं कौतुक!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई तक या वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनलला प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. आपल्या प्रदीर्घ मुलाखतीत विविध विषयांवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. इंडिया टुडे ग्रुपचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई आणि इंडिया टुडेचे सिनीयर एक्झुकिटिव्ह एड़िटर साहिल जोशी यांनी शरद पवार यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरं […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई तक या वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनलला प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. आपल्या प्रदीर्घ मुलाखतीत विविध विषयांवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. इंडिया टुडे ग्रुपचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई आणि इंडिया टुडेचे सिनीयर एक्झुकिटिव्ह एड़िटर साहिल जोशी यांनी शरद पवार यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरं दिली आहेत. हिंदुत्ववादी शक्ती कधी काळी मेनस्ट्रीममध्ये नव्हत्या. पण आता सलग दोनवेळा सत्ते आल्यानंतर राजकारणात काय बदल झाला आहे? असा प्रश्न राजदीप सरदेसाई यांनी विचारला त्यावेळी शरद पवारांनी संघाचं कौतुक केलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
प्रागतिक विचारांच्या शक्ती या तुलनात्मकदृष्ट्या दुबळ्या झाल्या. याचा फायदा कोण घेऊ शकतं? अतिरेकी भूमिका घेऊन जनमानसात विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करणारे काही कमिटेड लोक असतात. त्यांना त्यामध्ये यश मिळतं. असं असलं तरीही एक गोष्ट मान्य केली पाहिजे आज भाजपकडे एक संघटन (RSS) आहे. आजचा भाजप बऱ्याच बाबतीत काँग्रेसच्या जवळ जातो आहे. मात्र कमिटेड लोक त्या संघटनेत आहेत. मी नागालँडमधे होतो. विमानतळावर मला एक गृहस्थ दिसले. त्यांच नाव सांगत नाही पण तो चेहरा मला परिचित होता. मी त्यांना विचारलं इथे काय करतो? तर त्याने मला उत्तर दिलं ‘संघाने मला इथे 20 वर्षे काम करायला सांगितलं आहे. कॉलेज सोडल्यावर तू इथेच आहे का? तर तो हो म्हणाला.
तुझं घरदार कोण चालवतं? संघाकडून मिळालेले दोनशे रूपये घरी जातात. माझी इथली व्यवस्था संघाचे लोक करतात.










