Rajan Salavi: ”बाळासाहेबांच्या समाधीवर नतमस्तक होण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही”
राकेश गुडेकर रत्नागिरी: शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेल्या या मंडळींना शिवसेनाप्रमुखांच्या समाधीवर नतमस्तक होण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटातील मंत्र्यांवर केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. राज्यात सत्तांतर घडल्यानंतर तब्बल 39 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे गटातील आणि भाजपमधील प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. बंडखोरांबद्दल काय म्हणाले […]
ADVERTISEMENT

राकेश गुडेकर
रत्नागिरी: शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेल्या या मंडळींना शिवसेनाप्रमुखांच्या समाधीवर नतमस्तक होण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटातील मंत्र्यांवर केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. राज्यात सत्तांतर घडल्यानंतर तब्बल 39 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे गटातील आणि भाजपमधील प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.
बंडखोरांबद्दल काय म्हणाले राजन साळवी?
दरम्यान शिंदे गटातील नवनियुक्त मंत्र्यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. दरम्यान यावरूनच या मंत्र्यांवर शिवसेना उपनेते आमदार राजन साळवींनी जोरदार टीका केली आहे. राजन साळवी यांनी म्हटलं आहे की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण जगाचं दैवत आहे.
शिवसेना प्रमुखांचे पुत्र या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना पण लोकांनी ज्या पद्धतीने नामुष्की निर्माण करून खुर्चीवरून खाली उतरवलं, हे दुःख या लोकांनी वंदनीय शिवसेनाप्रमुखांना आणि पक्षाप्रमुखांना दिलेलं आहे, त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेल्या या मंडळींना शिवसेनाप्रमुखांच्या समाधीवर नतमस्तक होण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी केली आहे.









