PPE KIT घातलेला संशयित कोण? याचीही NIA कडून चौकशी सुरू
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ कार २६ फेब्रुवारीला सापडली होती. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या कांड्या होत्या. या प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यात आला आहे. NIA ने या प्रकरणात १३ मार्चच्या रात्री सचिन वाझेंना अटक केली आहे. आता या प्रकरणातली एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं […]
ADVERTISEMENT
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ कार २६ फेब्रुवारीला सापडली होती. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या कांड्या होत्या. या प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यात आला आहे. NIA ने या प्रकरणात १३ मार्चच्या रात्री सचिन वाझेंना अटक केली आहे. आता या प्रकरणातली एक मोठी घडामोड समोर आली आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणात जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं त्या सीसीटीव्ही फुटेजची चौकशी NIA ने सुरू केली आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीपीई किट घातलेला संशयित कोण होता हेदेखील आता NIA कडून तपासण्यात येतं आहे. एवढंच नाही तर त्यावेळी तिथे सचिन वाझे हजर होते की नव्हते हेदेखील तपासलं जाणार आहे.
मोठी बातमी: २५ मार्चपर्यंत सचिन वाझे NIA च्या कस्टडीत
हे वाचलं का?
PPE किटचं नेमकं प्रकरण काय?
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. या कारचं सीसीटीव्ही फुटेज १० मार्चला समोर आलं. या कारमध्ये एक पीपीई किट घातलेला माणूस होता जो काही वेळ कारमध्ये बसला आणि त्यानंतर तो कार सोडून निघून गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीपीई किट घातलेला माणूस स्पष्टपणे दिसतो आहे.
ADVERTISEMENT
हा संशयित नेमका कोण होता याची चौकशीही आता NIA ने सुरू केली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार इंटेरिअर व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून त्यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा येथील रेतीबंदर भागात आढळून आला. या भागातही NIA ने जाऊन काही फोटो काढले आणि काही ठिकाणचे व्हीडिओही घेतले आहेत.
ADVERTISEMENT
वादग्रस्त सचिन वाझे आहेत तरी कोण?
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा महाराष्ट्र एटीएसकडून केला जातो आहे. मनसुख हिरेन प्रकरणातही सचिन वाझे यांची चौकशी करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांनी जो जबाब नोंदवला त्यामध्ये माझ्या पतीचा खून झाला असून त्यांचा खून सचिन वाझेंनी केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणातही संशयाची सुई सचिन वाझेंकडेच अंगुलीनिर्देश करते आहे.
NIA च्या हाती महत्त्वाचे धागेदोरे
राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात NIA ने काही सीसीटीव्ही फुटेज जमा केली आहेत. यात सर्वात महत्वाचं फुटेज हे त्या संशयित इनोव्हा कारचे आहे, ज्यामुळे API सचिन वाझे यांच्या भोवती सगळी तपासाची चक्र फिरू लागली.
पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणारी इनोव्हा कार आणि अँटेलियाबाहेर दिसून आलेली इनोव्हा कार या एकच असल्याचं NIAच्या तपासातून समोर आलं आहे. सचिन वाझे ज्या गुन्हे तपास शाखेत अर्थात CIUमध्ये कार्यरत होते, त्या शाखेमध्ये ही इनोव्हा कार वापरली जात होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT