Wagner Chief vs Vladimir Putin: प्रिगोझिनला विमानतच संपवलं, पुतीन यांनी मित्र आणि शत्रूचा ‘असा’ काढला काटा!

मुंबई तक

Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता ते चर्चेत आले असले तरी, त्यांच्या होणारे आरोप मात्र गंभीर आहेत. त्यांनी आरोप फेटाळून लावले तरी मृत्यू पावलेल्या लोकांचं काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

ADVERTISEMENT

russian president vladimir putin enemies were being destroyed alexey navalny poisoned plan crashed prigozhin
russian president vladimir putin enemies were being destroyed alexey navalny poisoned plan crashed prigozhin
social share
google news

Russian President Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोन महिन्याआधी पुतिन यांच्यासमोर प्रचंड मोठी आव्हानं उभा राहिली होती. प्रायव्हेट आर्मी वॅगनरचे प्रमुख येवगेनी येवगेनी प्रिगोझिन यांचे निधन झाले आहे. बुधवारी झालेल्या विमान अपघातात येवगेनी प्रिगोझिन यांच्यासह दहा जणांचा मृत्यू झाला आहे. प्रिगोझिन यांच्या मृत्यूमुळे आता रशिया सरकारवर प्रश्न उपस्थित केला गेला आहे. या घटनेवरुनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते त्यांच्या मृत्यूबाबत बोलताना म्हणाले की, त्यांच्या अपघाती मृत्यूबद्दल मला बिलकूल आश्चर्य वाटत नाही. तर रशियामध्ये ज्या घटना घडत आहेत, त्या पुतिन शिवाय घडूच शकत नसल्याचे म्हटल्याने त्यांच्या या विधानाचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे.

संशयास्पद मृत्यू आणि आरोप

रशियाच्या विविध घटनांच्या इतिहासाचा संदर्भ बघितला की, लक्षात येईल की, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या शत्रूंच्या मृत्यूविषयी अनेक सवालही उपस्थित होऊ शकतो. तसेच पुतिन आणि त्यांच्या जवळच्या काही संबंधितांना विरोध करणाऱ्या लोकांचाही मृत्यू झाला आहे. तर काही जणांचा संशयास्पदरित्या मृत्यूही झाले आहेत. त्यामुळे पुतीन यांचे असणारे शत्रू कधी आणि त्यांचा कसा मृत्यू होतो हेही याचीही माहिती जाणून घेऊया…

वाचा : Kullu landslide : अवघ्या 26 सेंकदात 7 इमारती जमीनदोस्त! विध्वंसक व्हिडीओ व्हायरल

रशियामध्ये गृहयुद्ध

सगळ्यात आधी येवगेनी प्रिगोझिन (वय 62) यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. रशियामध्ये वॅगनर ही एक प्रायव्हेट आर्मी आहे. रशियाच्या सैनिकांबरोबर हे खासगी सैन्य युक्रेनविरोधात लढत होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे खासगी सैन्य लष्करी आणि गुप्तचर कारवायांमुळे वादात सापडले आहे. वॅगनर आर्मीचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन हे एकेकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळचे आणि खास होते. पण गेल्या काही महिन्यांत प्रिगोझिनने रशियन सैन्य आणि पुतीन यांच्याविरुद्धच बंड केले होते. 23-24 जून रोजी या सैनिकांनी रशियातील दक्षिणेकडील रोस्तोव शहरावर ताबा मिळवला होता. त्यानंतर मॉस्कोचा ताबा घेण्याची तयारीही सुरु ठेवण्यात आली होती. या सर्व कारवायामुळेच रशियामध्ये गृहयुद्धाचीच परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीमुळेच रशियामध्ये सत्तापालटाच्या चर्चांनाही वेग आला आहे.

रशियावरचे मोठे संकट

प्रिगोझिन यांच्याकडून रशियाचे संरक्षण मंत्री आणि त्यांच्या सैन्य दलावर गंभीर आरोप करुन त्यांनी त्यांच्याविरोधात विद्रोह व्यक्त केला होता. मात्र त्यावेळी पुतिन यांच्या मध्यस्तीमुळेच रशियावरचे मोठे संकटही टळले होते. मात्र प्रिगोझिन यांच्याबरोबरच अनेक शंका आणि संशयही व्यक्त केले जात होते. मात्र त्याचवेळी प्रिगोझिन यांच्याबरोबर संशय आणि संकटामध्ये प्रचंड वाढ झाली होती. एकीकडे संकटं वाढत असतानाच अमेरिकेतील एका गुप्तचर संघटनेकडून मात्र प्रिगोझिन यांची हत्या होऊ शकते असा संशय व्यक्त केला गेला होता. मागील महिन्यामध्येच बिडेन आणि आणि सीआयएचे संचालक विल्यम्स बर्न्स यांनी प्रिगोझिनच्या बंडानंतर संभाव्य धोक्याचीही शक्यता वर्तवली होती. त्या पत्रकार परिषदेत बिडेन म्हणाले होते की, मी जर प्रिगोझिनच्या जागी राहिलो असतो तर मी खाण्यापिण्याचाही विचार केला असता. मी माझ्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीवरही लक्ष ठेवले असते. मात्र हे सर्व गोष्टी कुणी हसण्यावर घेत असले तरी माझ्यासह रशियातील कुणालाच हे माहिती नसणार की, प्रिगोझिन यांचे भविष्य नेमकं काय असणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp