नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर आज होणार फैसला; कोर्टात काय घडलं?
भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक होणार का? याचा निर्णय आता आज (29 डिसेंबर) होणार आहे. मंगळवारी (28 डिसेंबर) न्यायालयात काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. मात्र या प्रश्नाचं उत्तर आता आज मिळणार आहे. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने युक्तिवाद थांबवण्यात आला. सरकारी वकील विरूद्ध नितेश राणेंचे वकील यांच्यात कोर्टात वाद-प्रतिवादाचा सामना बघायला मिळाला. आज […]
ADVERTISEMENT
भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक होणार का? याचा निर्णय आता आज (29 डिसेंबर) होणार आहे. मंगळवारी (28 डिसेंबर) न्यायालयात काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. मात्र या प्रश्नाचं उत्तर आता आज मिळणार आहे. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने युक्तिवाद थांबवण्यात आला. सरकारी वकील विरूद्ध नितेश राणेंचे वकील यांच्यात कोर्टात वाद-प्रतिवादाचा सामना बघायला मिळाला. आज न्यायालय काय निर्णय देणार हे नितेश राणेंच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
मंगळवारी न्यायालयात काय घडलं?
हे वाचलं का?
महाविकास आघाडी सरकारच्या वतीने वकील प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी यांनी बाजू मांडली. पोलिसांविरोधात काही तक्रार नाही असं सांगणयात येतं आहे. मग पोलिसांवर दबाव आहे अशी भूमिका कशी काय घेता? विधानभवनाच्या पायऱ्यांवर कुणी कसला आवाज काढला त्याचा इथे काय संबंध आहे? पोलिसांच्या बाबतीत तुमच्याच दोन वेगळ्या भूमिका आहेत. दखलपात्र गुन्हा असेल तर तक्रार लगेच झाली पाहिजे. सातपुते हा स्वाभिमानीचा कार्यकर्ता होता आणि त्याने नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. आरोपीने सगळ्यांच्या देखत चाकू हल्ला केला. नितेश राणे, गोट्या सावंत यांना फोनवरून हल्ला केल्याचं सांगू शकत नाही का? आमच्यामागे मोठ्या व्यक्ती आहेत हे आरोपींना कशावरून सुचवायचं नसेल ? हे प्रश्न सरकारच्या वतीने विचारण्यात आले.
नितेश राणे यांच्या अटकेची मागणी का होतेय? नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT
नितेश राणे यांच्या वतीने संग्राम देसाई लढत आहेत. त्यांनी अंतरिम जामिनाची विनंती केली होती. त्यांनी कोर्टात हा मुद्दा उपस्थित केला की सोमवारी नितेश राणेंना दिलेली नोटीस चुकीची आहे आणि सरकार पोलिसांवर दबाव टाकतं आहे. कुठलंही सर्च वॉरंट नसताना राणे यांच्या रूग्णालयाची झडती घेण्यात आली. जो या प्रकरणातला फिर्यादी आहे त्याचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कसा काय केला? कुठलाही हल्ला झाला तर त्यातली संशयितांची नावं गुप्त ठेवली जातात, मग नितेश राणे, गोट्या सावंत यांना नोटीस बजावली गेल्याचं तपास अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना का सांगितलं? राग आणि आकस मनात ठेवून नितेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. नितेश राणे आणि सचिन सातपुतेचा सीडीआर पोलिसांना मिळाला आहे.
ADVERTISEMENT
सुनावणीवेळी कोर्टाची वेळ संपल्यानं युक्तिवाद थांबवण्यात आला. उर्वरित युक्तिवाद आता आज (29 डिसेंबर) पुन्हा सुरु केला जाईल. सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील युक्तिवाद करतील. या सुनावणीत नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये भाजप आमदार नितेश राणे हे अजूनही नॉट रिचेबलच आहेत. ते केव्हा समोर येणार, हे याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT