कोण आहेत टीना डाबींचे होणारे पती प्रदीप गावंडे?, कशी सुरू झाली दोघांची लव्हस्टोरी?

मुंबई तक

अतहर खान यांच्यासोबत लव्हस्टोरी आणि लग्नामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आयएएस अधिकारी टीना डाबी दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार आहेत. अतहर खान यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अलिकडेच टीना डाबी यांचा आयएएस अधिकारी असलेले प्रदीप गावंडे यांच्यासोबत साखरपुडा झाला. ही बातमी समोर आल्यानंतर डॉ. प्रदीप गावंडे यांच्याबद्दल अनेक जण माहिती जाणून घेत आहेत. प्रदीप गावंडे हे राजस्थान केडरचे अधिकारी असले, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

अतहर खान यांच्यासोबत लव्हस्टोरी आणि लग्नामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आयएएस अधिकारी टीना डाबी दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार आहेत. अतहर खान यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अलिकडेच टीना डाबी यांचा आयएएस अधिकारी असलेले प्रदीप गावंडे यांच्यासोबत साखरपुडा झाला. ही बातमी समोर आल्यानंतर डॉ. प्रदीप गावंडे यांच्याबद्दल अनेक जण माहिती जाणून घेत आहेत. प्रदीप गावंडे हे राजस्थान केडरचे अधिकारी असले, तरी महाराष्ट्रीय आहेत आणि जन्माने लातूरकर आहेत.

डॉ. प्रदीप गावंडे यांनी ‘मुंबई Tak’शी संवाद साधला. ४१ वर्षीय प्रदीप गावंडे पहिल्यांदाच बोहल्यावर चढणार आहेत. काही माध्यमांच्या वृत्तांत हे त्यांचं दुसरं लग्न असल्याचं म्हटलं, मात्र त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. प्रदीप गावंडे हे मूळचे लातूरचे आहेत. लातूर शहरातच त्यांचा जन्म झाला आणि मराठवाड्यातच त्यांची त्यांचं शिक्षण पूर्ण केलं.

प्रदीप गावंडे यांनी लातूरमधील राजश्री शाहू महाविद्यालयातून १२वीचं (विज्ञान शाखा) शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी ते औरंगाबादला आले. औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून (घाटी) त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर २०१३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. आता ते राजस्थान केडरचे अधिकारी म्हणून सनदी सेवेत आहेत.

शिक्षण घेत असताना सीनियरकडून प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे आपण यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला, असं प्रदीप गावंडे सांगतात.