MNS नेते Gajanan Kale यांच्या गैरमार्गाने मिळवलेल्या पैशाचं बिंग फुटलं; पत्नीनं केला गौप्यस्फोट
निलेश पाटील, नवी मुंबई मनसेचे (MNS) नवी मुंबईचे (Navi Mumbai) शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांच्यावर त्यांची पत्नी संजीवनी काळे हिने तीनच दिवसांपूर्वी अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप करत त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देखील दिली होती. आता पुन्हा एकदा संजीवनी यांनी गजानन काळे हा कशाप्रकारे काळा पैसा (Black Money) कमवतो याचा खुलासा थेट मीडियासमोर केला आहे. सुरुवातीला […]
ADVERTISEMENT
निलेश पाटील, नवी मुंबई
मनसेचे (MNS) नवी मुंबईचे (Navi Mumbai) शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांच्यावर त्यांची पत्नी संजीवनी काळे हिने तीनच दिवसांपूर्वी अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप करत त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देखील दिली होती. आता पुन्हा एकदा संजीवनी यांनी गजानन काळे हा कशाप्रकारे काळा पैसा (Black Money) कमवतो याचा खुलासा थेट मीडियासमोर केला आहे.
सुरुवातीला संजीवनी काळे यांनी आपल्या तक्रारीत असं म्हटलं होतं की, गजानन काळे यांनी शारीरिक छळ करत आपल्यावर प्रचंड अत्याचार केला. त्यांच्या या आरोपामुळे मनसेमध्ये एकच खळबळ माजली होती. कारण याप्रकरणी गजानन काळे यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक अत्याचार असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मात्र तीन दिवस उलटून गेलेले असताना देखील काळे याच्यावर कारवाई होत नसल्याने संजीवनी काळे यांनी आज पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधला.
गजानन काळे यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा फायदा उचलून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केली आहे. शिक्षण प्रवेश आणि मनपा अधिकाऱ्यांना धाक दाखवून करोडो रुपये गजानन काळे यांनी कमावले आहेत. याबाबत तपास होणार असेल तर आपण यंत्रणेला सगळी माहिती देण्यास तयार आहोत. असं वक्तव्य संजीवनी काळे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
संजीवनी काळे यांनी नेमके काय आरोप केले आहेत?
ADVERTISEMENT
‘गजानन काळे हा घरात जास्त दिवस रोकड न ठेवता अन्य व्यक्तीच्या नावावर सर्व रोकड बँकेत जमा करायचा. ही रोकड घेऊन येणाऱ्या चार कार्यकर्त्यांची नावेही त्यांनी सांगितली आहेत. लाखो रुपये गोळा करून हे कार्यकर्ते घरी यायचे. एबी नावाच्या बोगस कंपनीच्या नावाने सर्व आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत.’
सदनिका, चार चाकी वाहने, मोबाईल अश्या सर्व गोष्टींचे व्यवहार याच कंपनीच्या नावावर करण्यात आल्याचा गौप्यस्फोटही संजीवनी यांनी केला आहे. त्यामुळे आता गजानन काळे यांच्या अडचणीत अधिक भर पडण्याची शक्यता आहे.
गजानन काळेच्या अनैतिक व्यवहारांना आपला विरोध असल्याने तो आपल्याला दमबाजी करत असल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे. दुसरीकडे या प्रकरणी मनसेच्या नेत्यांनी साधी दखलही घेतली नसल्याने संजीवनी काळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याचवेळेस त्यांनी असाही आरोप केला आहे की, ‘पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. पोलीस मध्यस्थी करून प्रकरण मिटवून टाकण्यासाठी दबाव टाकत आहेत. पती-पत्नीमध्ये समेट घडवून आणतो असे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत.’ तसेच पत्रकार परिषद घेण्यास देखील पोलिसांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
गजानन काळे यांनी राजकीय पदाचा दुरुपयोग करून केलेल्या काळया कमाईची माहितीच संजीवनी यांनी पत्रकारांच्या समोर मांडली. करोडो रुपयांची सदनिका घेताना एवढा पैसा आला कुठून? याची चौकशी केली तरी सगळे बिंग फुटेल असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं आहे.
यावेळी राजकीय स्टंटबाजी करणाऱ्या नेत्यांनी दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, शिवसेना स्थानिक नेत्या रंजना शिंत्रे यांनी गजानन काळे याच्यावर लवकर कारवाई करावी म्हणून पोलिसांची भेट घेतली आहे. या प्रकरणात असलेला दबाव यामुळे आपल्याला पाठिंबा देण्यास कोणीही पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
MNS City President: अनेक स्त्रियांशी संबंध, मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप
कामगार संघटनेच्यामार्फत कामगार भरती करण्यासाठी गजानन काळे याने लाखो रुपये उकळले असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. मनसे मनपा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आप्पासाहेब कौथुले यांच्या माध्यमातून हे पैसे उकळण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
ADVERTISEMENT