Mumbai Cruise Drugs Party: ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेला आर्यन खान आहे तरी कोण?

मुंबई तक

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात आता अटक करण्यात आली आहे. अत्यंत हायप्रोफाईल केसमध्ये एनसीबीने केलेल्या या कारवाईने बरीच खळबळ माजली आहे. शाहरुख खानचा मुलगा या संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याने आता त्याच्याबाबत बरीच चर्चा सुरु झाली आहे. शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन हा याआधी फारसा कधी चर्चेतही नव्हता. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात आता अटक करण्यात आली आहे. अत्यंत हायप्रोफाईल केसमध्ये एनसीबीने केलेल्या या कारवाईने बरीच खळबळ माजली आहे. शाहरुख खानचा मुलगा या संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याने आता त्याच्याबाबत बरीच चर्चा सुरु झाली आहे.

शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन हा याआधी फारसा कधी चर्चेतही नव्हता. तो नेहमीच स्वतःला लाइमलाईटपासून दूर ठेवत असल्याचं पाहायला मिळालं होतं. पण ड्रग्स प्रकरणात आर्यनला अटक झाल्यानंतर आता हाच आर्यन प्रचंड चर्चेत आला आहे. त्यामुळे जाणून घेऊयात आर्यनबाबत सविस्तरपणे.

शाहरूख आणि गौरी या दाम्पत्याला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. त्यापैकी आर्यन हा शाहरूख आणि गौरीचं पहिलं अपत्य. नवी दिल्ली येथे 13 नोव्हेंबर 1997 रोजी आर्यनचा जन्म झाला.

इतर स्टार किड्सप्रमाणेच आर्यनचं विदेशात शिक्षण झालं आहे. धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर तो लंडनच्या सेव्हन ओक्समध्ये पुढील शिक्षणासाठी गेला होता. त्यानंतर साऊदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठात आर्यनने उच्चशिक्षण घेतलं. कॅलिफोर्नियातून त्याने सिनेमा निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आहे. आर्यनला लहानपणापासूनच मार्शल आर्टमध्ये रुची असल्याने त्याने तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्टही मिळवला होता.

हे वाचलं का?