Ajit Pawar : मुद्दा भाजपसोबत जाण्याचा पण, पवारांनी संजय राऊतांना झापले!
भाजपसोबत जाण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. पण, या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवारांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नामोल्लेख न करता हल्ला चढवला. अजित पवार नेमकं काय म्हणाले पहा?
ADVERTISEMENT

जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार, असं सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. पण, या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवारांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नामोल्लेख न करता हल्ला चढवला. अजित पवार नेमकं काय म्हणाले पहा?
34 आमदारांसह अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांबद्दल अजित पवारांनी खुलासा केला. याच वेळी त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख न करता तिखट शब्दात सुनावलं.
अजित पवार म्हणाले, “आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करत असतील. मी माझ्या पक्षाबद्दल म्हणत नाही. माझ्या पक्षात माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही. परंतु पक्षाबाहेरचे. आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते ते आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक? पक्षाची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी मी विचारणार आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊतांबद्दल संताप व्यक्त केला.
हेही वाचा >> Ajit Pawar भाजपसोबत जाणार?; संजय राऊत म्हणाले, ’20-25 आमदार जाणं म्हणजे…’
अजित पवार असंही म्हणाले की, “तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं मुख्यपत्र आहे, त्याबद्दल बोला. पण, तुम्ही आम्हाला कोट करून… ते असं झालं, तसं झालं… आम्ही आमची स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत.”