G20 Summit 2023: जो बायडेन यांचं विमानतळावर कोणी केलं स्वागत?, उलटसुलट चर्चांना उधाण
G20 Summit 2023 Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे G20 परिषदेसाठी भारतात आले. मात्र, यावेळी विमानतळावर त्यांचे स्वागत व्ही. के सिंह यांनी केलं. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT

G20 Summit Delhi 2023 LIVE Updates: नवी दिल्ली: राजधानी दिल्ली G-20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit) सज्ज आहे. या दोन दिवसीय परिषदेत सहभागी होण्यासाठी परदेशी पाहुणे एकामागून एक भारतात येऊ लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) हे भारतात आले आहेत. त्याआधी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष आणि अनेक देशांचे प्रमुख भारतात पोहोचले. (g20 summit 2023 live minister of state vk singh welcomed joe biden us president meets pm modi)
दरम्यान, जो बायडेन हे भारतात आल्यानंतर त्यांचे स्वागत केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह (V. K. Singh) यांनी केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या स्वागतासाठी एखादा तोलामोलाचा नेता विमानतळावर जाणं अपेक्षित होतं. मात्र, त्याऐवजी व्ही के सिंह यांना पाठविण्यात आल्याने याबाबत राजधानी दिल्लीत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा >> Mumbai Crime : एअर होस्टेस हत्या प्रकरण, आरोपीची लॉकअपमध्येच पँटने गळफास घेऊन आत्महत्या
राजधानी दिल्लीत G-20 परिषदेसाठी परदेशी पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दिल्लीत पोहोचले आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्याआधी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना नवी दिल्लीत पोहोचल्या. G-20 मध्ये भारताने बांगलादेशला पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. याशिवाय इटलीचे पीएम जॉर्जिया मेलोनी आणि अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीज दिल्लीला पोहोचले आहेत. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेही भारतात पोहोचले आहेत. बायडेन आज (8 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.