Cabinet Portfolio: मोठी बातमी… राष्ट्रवादीकडे अर्थ, सहकारसह मोठी खाती, शिवसेनेला दणका

साहिल जोशी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांची खाती मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. खातेवाटपाची यादी ही आता निश्चित झाली आहे. पाहा कोणाला कोणती खाती मिळाली

ADVERTISEMENT

ajit pawar ncp finance cooperative agriculture women child development food and civil supplies
ajit pawar ncp finance cooperative agriculture women child development food and civil supplies
social share
google news

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एंट्री करून अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बारा दिवस झाले तरी कोणतीही खाती मिळालेली नाहीत. मात्र, आज (14 जुलै) अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांची खाती मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. खातेवाटपाची यादी ही आता नुकतीच राजभवनाकडे गेली असून आता राज्यपालांचा त्यावर सही होणं फक्त बाकी आहे. खात्रीलायक माहितीनुसार, अजित पवार त्यांच्या नऊही आमदारांना अनेक चांगली खाती मिळालेली आहेत. पण याचा सर्वाधिक फटका हा मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेतील मंत्र्यांनाच बसल्याचं पाहायला मिळतं आहे. (maharashtra cabinet portfolio list allocation ajit pawar ncp finance cooperative agriculture women child development food and civil supplies latest update on maharashtra politics)

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मिळाली ‘ही’ खाती

1. अर्थ
2. सहकार
3. कृषी
4. महिला व बालकल्याण
5. मदत व पुनर्वसन
6. वैद्यकीय शिक्षण
7. क्रीडा
8. अन्न व नागरी पुरवठा
9. अन्न आणि औषध प्रशासन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांना कोणती खाती मिळाली?

  • अजित पवार – अर्थ
  • धनंजय मुंडे – कृषी
  • दिलीप वळसे पाटील – सहकार
  • हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
  • छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा
  • धर्मराव अत्राम – अन्न आणि औषध प्रशासन
  • अनिल भाईदास पाटील – क्रीडा
  • अदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण
    अजित पवार शिवसेनेत येण्याआधी शिंदे-फडणवीसांच्या मंत्र्यांकडे कोण-कोणती खाती होती?

भाजपकडे कोणती खाती होती?

1) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस– गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार

हे वाचलं का?

    follow whatsapp