रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री! आयुक्तांनी सादर केला अहवाल
राज्य महिला आयोगाने रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात ठाणे पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली होती. या प्रकरणातील अहवाल आयुक्तांनी सादर केला.
ADVERTISEMENT

ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाने ठाण्यातील राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. रोशनी शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली, मात्र गुन्हा दाखल झाला नाही. आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाची एन्ट्री झाली आहे. आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात आज पोलीस आयुक्तांनी अहवाल सादर केला.
ठाण्यातील कासारवडवली भागात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या म्हणजेच शिवसैनिक महिलांनी मारहाण केली. हे प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच रोशनी शिंदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत थेट शिंदे गटातील महिलांची नावं घेतली आहेत.
हेही वाचा >> ‘ठाकरे, विचारे, आव्हाड रोशनी शिंदेंचा जीवही घेऊ शकतात’, शिंदेंच्या पत्राने खळबळ
पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर १५ महिलांनी मारहाण केल्याचा आरोप रोशनी शिंदेंनी केलेला आहे.
कासारवडवली पोलिसांत या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही. दरम्यान, रोशनी शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांबद्दल अवमानकारक पोस्ट केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.