राष्ट्रपती निवडणूक : भाजप की काँग्रेस… ममता बॅनर्जींमुळे कुणाची चिंता वाढणार?
देशातील सर्वोच्च पदासाठीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून, २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील राजकीय पक्ष राष्ट्रपतीपदाच्या तयारीला लागले आहे. त्यातच आता ममता बॅनर्जी यांनी यात पुढाकार घेतल्यानं रंगत वाढली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने […]
ADVERTISEMENT

देशातील सर्वोच्च पदासाठीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून, २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील राजकीय पक्ष राष्ट्रपतीपदाच्या तयारीला लागले आहे. त्यातच आता ममता बॅनर्जी यांनी यात पुढाकार घेतल्यानं रंगत वाढली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे दिल्ली राजकीय हालचाली वाढू लागल्या आहेत. २०२४ ला लोकसभा निवडणुका होणार असून, त्यापूर्वी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यासाठी राष्ट्रपती पदाची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.
एनडीए आणि यूपीए या दोन्ही राजकीय आघाड्यांना एकजूट आणि ताकद दाखवून देण्याची ही संधी असून, लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे.
राष्ट्रपती निवडणुकीबद्दल काँग्रेसकडून काय पाऊल उचललं जातं, याची प्रतिक्षा असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी एडीएनतील घटक पक्षांचे प्रमुख आणि विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी दिल्लीत एक बैठक बोलावली आहे.