Raj-Uddhav: ठाकरे बंधू महाराष्ट्रात इतिहास घडवतील?, ‘ही’ चर्चा अन्…
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का? अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. जाणून घ्या याचविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics Update: माधवी देसाई, मुंबई: राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन आक्रमक बंधू पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यावेळी निमित्त ठरलंय उद्धव ठाकरेंची मुलाखत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत जाण्याबाबत पहिल्यांदाच थेट भाष्य केलंय. या निमित्तानं हे दोन बंधू एकत्र येणारच नाहीत का? त्यांच्या एकत्र येण्याची शक्यता किती? दोन बंधू एकत्र आलेच तर काय होईल याच गोष्टींचा आढावा घेऊयात. (raj thackeray and uddhav thackeray come together two brothers maharashtra political atmosphere mns shiv sena mumbai latest update on maharashtra politics)
अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून सत्तेत हातमिळवणी केली आणि मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना भवनबाहेर एक बॅनर झळकला. राजसाहेब उद्धवसाहेब आता तरी एकत्र या अशा आशयाचा हा बॅनर होता. त्यानंतर ठाण्यातही असे बॅनर झळकले. 4 जुलैला मनसे नेत्यांची एक बैठक शिवतीर्थवर पार पडली. या बैठकीत नेत्यांनीही राज ठाकरेंकडे दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी केली. राज ठाकरेंनी या चर्चांवर थेट भाष्य करणं टाळलं. मात्र, या बैठकीनंतर जवळपास 20-22 दिवस उलटले आणि उद्धव ठाकरे आता या चर्चांवर व्यक्त झाले.
हे ही वाचा >> ‘मार्शल बोलवून बाहेर काढावं लागेल’, गोपीचंद पडळकरांना नीलम गोऱ्हेंनी झापलं
उद्धव ठाकरेंनी या चर्चा स्पष्टपणे फेटाळून लावल्या. मात्र, त्यांनी भविष्यात राज ठाकरेंशी युतीची शक्यता मावळली, किंवा कधीच राज ठाकरेंशी युती करणार नाही अशा प्रकारचं विधान केलेलं नाही. सध्या राज्यात होणाऱ्या अजब युती- आघाडी पाहता राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, गेले 18 वर्ष वेगळी चूल मांडलेले राज ठाकरे पुन्हा भावासोबत येऊ शकतात.
आता उद्धव-राज यांच्या एकत्र येण्याची चर्चा आत्ताच का रंगली हे आपण पाहूया..
1) राज्यात बदललेली राजकीय समीकरणं- शिवसेनेतील फुटीला आता एक वर्ष उलटलं आहे. अजित पवारांच्या फुटीनंतर विरोधी पक्षांच्या आक्रमणाची धार कमी झाली आहे. ही स्पेस भरुन काढण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात.