Sanjay Raut : गटारं, अंधभक्त, नेहरू… PM मोदींना डिवचलं; राऊत असं काय बोलले?
संजय राऊत यांनी राज्यसभेत खणखणीत भाषण केले. या भाषणात त्यांनी पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीचा उहापोह केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. राऊतांचे हे भाषण चर्चेत आले आहे.
ADVERTISEMENT

Sanjay Raut Speech in Rajya Sabha : ‘पंडित नेहरूंच्या काळातही भरपूर नाल्या, गटारं होती, पण त्यातून गॅस काढून चहा बनवा असं ते म्हणाले नाही’, असं म्हणत शिवसेना (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्ला चढवला. (Sanjay Raut hits out At PM Narendra Modi)
‘भारताचा गौरवशाली अंतराळ प्रवास’ या विषयावरील चर्चत संजय राऊत सहभागी झाले. यावर बोलताना संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटे काढले.
संजय राऊत म्हणाले, “भारताचा अंतराळ प्रवास खूपच गौरवशाली आहे. सरकारं येतात आणि जातात. पंतप्रधानही आले आणि गेले. पण, भारताचा अंतराळ प्रवास निरंतर चालू आहे. हा पंडित नेहरू विरुद्ध नरेंद्र मोदी असा वाद व्हायला नको. तुम्ही तिकडून मोदी… मोदी म्हणणार आणि आम्ही नेहरू नेहरू म्हणणार. हे टीम वर्क आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
‘काही पंतप्रधान विज्ञानवादी असतात, तर काही अंधभक्त’
“2014 आधीही या देशात खूप सारं काम झालं आहे. त्यामुळेच आज चांद्रयान वरती गेलं आहे. पंतप्रधानांचे आपापले विचार असतात. काही विज्ञानवादी असतात. काही अंधश्रद्धावादी असतात. काही अंधभक्त असतात. काही भक्त असतात”, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला.