Shiv Sena MLAs : ‘ते काम आमचं की विधानसभा अध्यक्षांचं?’ ठाकरेंचा कोर्टात खडा सवाल
सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीचा मुद्दा कोर्टात मांडला.
ADVERTISEMENT

Shiv Sena MLAs Disqualification case Supreme Court Hearing : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कोर्टात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज (18 सप्टेंबर) सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीबद्दलचा मुद्दा सुप्रीम कोर्टात मांडला. यावेळी सुप्रीम कोर्टाने 11 मे रोजी निकाल दिल्यानंतर आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांनी काय केले, असा सवाल केला. ‘विधानसभा अध्यक्ष हे सांगू शकत नाहीत की आम्ही योग्य वेळी ऐकू. तारखा सांगाव्या लागतील’, असं सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान सांगितलं.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून सुनावणी घेण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा शिवसेनेचे (युबीटी) प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने सिब्बल यांनी मांडला. त्यानंतर 11 मे रोजी कोर्टाने निकाल दिला. तेव्हापासून विधानसभा अध्यक्षांनी काय केले, अशी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना विचारणा केली.
शिवसेना आमदार अपात्रता याचिका सुनावणी : सुप्रीम कोर्टात काय झालं?
कपिल सिब्बल – आम्हाला गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. आम्ही जून 2022 मध्ये अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने 12 जुलै 2022 रोजी अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती दिली. न्यायालयाने मे मध्ये तपशीलवार निकाल दिला.
हेही वाचा >> Rahul Narvekar : कट्टर शिवसैनिक राहिलेल्या नार्वेकरांनी किती पक्ष बदलले?
कपिल सिब्बल – अपात्रतेच्या अर्जांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आम्ही 15 मे, 22 मे, 20 जून रोजी स्मरणपत्रे दाखल केली. त्याला प्रतिसाद दिला गेला नाही. त्यामुळे आम्ही रिट याचिका दाखल केली.