भाजपसमोर “झुकेगा नहीं” म्हणणाऱ्या संजय राऊत यांचा ‘पुष्पा’ अंदाज चर्चेत

मुंबई तक

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यातल्या एका कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत आपला पुन्हा एकदा खास अंदाज दाखवून दिला आहे. साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांचा रोखठोक अंदाज दिसून आला. महाविकास आघाडी, ईडीच्या कारवाया, केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधले संबंध या आणि अशा विविध विषयांवर त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली. भाजपसमोर […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यातल्या एका कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत आपला पुन्हा एकदा खास अंदाज दाखवून दिला आहे. साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांचा रोखठोक अंदाज दिसून आला. महाविकास आघाडी, ईडीच्या कारवाया, केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधले संबंध या आणि अशा विविध विषयांवर त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली. भाजपसमोर झुकणार नाही असंही त्यांनी आपला पुष्पा अंदाज दाखवून देत सांगितलं.

भाजपसोबत गेला असतात तर मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षं संपली असती आता शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे संपली आहेत कसं वाटतं आहे हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राऊत म्हणाले की आम्ही भाजपला फसवून सत्तेत आलेलो नाही. भाजपच्या वृत्तीचा आम्ही अभ्यास केला. त्यांनी शब्द पाळला नाही त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. हा प्रयोग आता देशात यशस्वी करण्याचा आमचा मानस आहे.

“बाळासाहेबांना महाविकास आघाडीचा प्रयोग आवडला असता?” संजय राऊत आणि शरद पवार म्हणाले…

ईडीच्या धाडी फक्त भाजपच्या विरोधकांवरच का पडतात असं जेव्हा विचारलं तेव्हा संजय राऊत यांनी पुष्पा सिनेमाप्रमाणे त्यांचा झुकेगा नहीं अंदाज दाखवून दिला. २०२४ नंतर त्यांनाही कळेल. वक्त हमारा भी आयेगा. याचा त्रास होतो का? असं विचारलं तर मी म्हणेन नाही. पुष्पा मधला डायलॉग आहे ना मै झुकेगा नहीं. कोणतीही नोटीस न देता ईडी चौकशी केली गेली. मात्र ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर धाडी पडल्या तेव्हा मी अमित शाह यांना थेट फोन केला आणि म्हटलं त्या गरीबांना त्रास देऊ नका त्यापेक्षा मला अटक करा असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp