Nawab Malik : शरद पवार-अजित पवारांनी लावली ताकद; मलिकांसाठी इतकी चढाओढ का?
नवाब मलिक, अजित पवार, शरद पवार : शरद पवारांनी कॉल केल्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह नवाब मलिक यांची भेट घेतली.
ADVERTISEMENT
Nawab malik news in marathi : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर गट वाढवण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील संघटन मजबूत करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार गटातील नेते पक्षातील नेत्यांना आपल्या गटात घेण्यासाठी भेटीगाठी घेताहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे बुधवारी (16 ऑगस्ट) दोन्ही गटातील नेत्यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांची घेतलेली भेट.
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: मलिक यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले. त्यानंतर अजित गटाचे छगन भुजबळ यांनीही मलिक यांची भेट घेतली. मलिक यांना भेटण्यासाठी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखही पोहोचले. त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारीही होते.
नवाब मलिक (वय 64 वर्षे) यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात अंतरिम जामीन मंजूर केला. मनी लाँड्रिंग प्रकरणात ते दीड वर्षापासून तुरुंगात होते. मलिक यांना सोमवारी (14 ऑगस्ट) मुंबईतील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मलिक दोन महिन्यांच्या अंतरिम जामिनावर आहे.
हे वाचलं का?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित कथित प्रकरणात ED ने फेब्रुवारी 2022 मध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत मलिकला अटक केली होती. किडनीशी संबंधित आजारामुळे मलिक यांच्यावर मे 2022 पासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आधी अजित पवार, मग छगन भुजबळही पोहोचले
बुधवारी (16 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील इतर नेतेही त्यांना भेटायला आले होते.
ADVERTISEMENT
वाचा >> ‘बायको आत्महत्या करेल सांगून शिंदेंकडून घेतलं मंत्रिपद’, भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब
त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विट करून नवाब मलिक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगितले. त्याचे फोटो शेअर केले आहेत. भुजबळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते आहेत.
ADVERTISEMENT
शरद पवारांच्या नेत्यांनी घेतली मलिकांची भेट
अजित पवारांसह त्यांचे नेते भेटून जात नाही, तोच शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख हेही नवाब मलिक यांना त्यांच्या घरी भेटले. पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, ‘मलिक यांना राजकीय कारणासाठी तुरुंगात टाकण्यात आले.’ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्यासह अन्य नेतेही देशमुख यांना भेटण्यासाठी आले होते.
‘संजय राऊतही घेणार नवाबांना भेटायला’
आदल्या दिवशी (15 ऑगस्ट) शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणाले होते की, ते लवकरच नवाब मलिक यांची भेट घेणार आहेत. नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगच्या वेगवेगळ्या प्रकरणात अटक केली होती. तिघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले. नंतर राऊत आणि देशमुख जामिनावर बाहेर आले.
मलिकच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष…
यापूर्वी आमदार सरोज अहिरे आजारी असताना मंत्री छगन भुजबळ त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर सरोज अहिरे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे मलिक यांच्याबाबत राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सध्या मलिकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवाब मलिकांची ताकद… समजून घ्या राजकारण
नवाब मलिक यांची सुटका झाल्यापासून त्यांच्या घरी राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. नेत्यांच्या या भेटी गेल्या दोन दिवसांत जास्त झाल्या आहेत. नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर सर्वप्रथम शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या स्वागतासाठी आल्या होत्या. सुप्रिया सुळेही मलिक यांच्या घरी गेल्या.
शरद पवारांच्या बोलण्याआधी अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही मलिक यांची त्यांच्या घरी भेट घेण्यासाठी पोहोचले होते. अजित गटाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरही उपस्थित होत्या.
वाचा >> NCP चा नेमका अध्यक्ष कोण? शरद पवारांकडे मागितले ‘पुरावे’, फक्त ‘एवढीच’ मुदत
त्यानंतर शरद पवार यांनी मलिक यांना फोन करून त्यांची प्रकृती जाणून घेतली. त्यामुळेच मलिक कोणाच्या बाजूने आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मलिकांनी भूमिका स्पष्ट केली, परंतु ते करताना त्यांनी अत्यंत सावधपणे विधान केले. आपण मूळ राष्ट्रवादीसोबत असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस मिळवण्याची लढाई
2 जुलै रोजी राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटाने पक्षावर दावा केला. शरद पवारांसोबतच त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला. अचानक झालेल्या बंडखोरीमुळे पक्षाच्या आमदारांचा गोंधळ उडाला आहे.
वाचा >> Kalyan Crime: आईसमोरच सपासप वार…! तरुणीने रक्ताच्या थारोळ्यात सोडला जीव
नवाब मलिकही त्याच कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनीही सायलेंट मोडमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याचेच दिसत आहे. मात्र, नवाब मलिकांच्या मनात काय आहे, हा प्रश्न तुरुंगातून बाहेर आल्यापासून कायम आहे. नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वक्तव्य केले होते. ते म्हणाले, ‘मी कोणत्याही गटात सामील होणार नाही. मी मूळ राष्ट्रवादीशीच राहीन.’ याच विधानावरून ते कुंपणावर असल्याचे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांची भूमिकाही स्पष्ट नाही
नवाब मलिक यांचे हे विधान सोपे वाटत असले तरी त्यांची भूमिका मोठे संकेत देत आहे. कारण अशी भूमिका घेणारे नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे पहिले आमदार नाहीत. यापूर्वीही अनेक आमदारांनी अशीच भूमिका घेतली असून अधिवेशनातही हे दिसून आले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना जेव्हा जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्यांनी आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत, असे सांगितले. मी अजित पवार किंवा शरद पवार यांच्यासोबत आहे, असे सांगणारे फार कमी आमदार होते. अधिवेशनात ते स्पष्टपणे भूमिका घेताना दिसले. राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने आमदार सायलेंट मोडवर आहेत.
‘दोन्ही गट स्वत:ला खरा राष्ट्रवादी सांगत आहेत’
खरी राष्ट्रवादी आमचीच असल्याचा दावा शरद पवार समर्थक नेते करत आहेत. अजित पवार गटातूनही असेच बोलले जात आहे. मात्र, हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेले आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणूक आयोग निकाल देत नाही, तोपर्यंत मूळ राष्ट्रवादी पक्ष कोणाच्या हाती आहे हे स्पष्ट होणार नाही. याचा फायदा मलिक यांनी घेतल्याचे बोलले जाते. आता मूळ राष्ट्रवादी पक्ष कोणाची बाजू घेणार यावर बरेच काही अवलंबून राहणार असल्याचे दिसते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT