Ankita Patil : "अजित पवारांनी 3 वेळा पाठीत खंजीर खुपसला", अंकिता पाटलांचा आता थेट इशारा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता लोखंडे यांनी अजित पवारांसमोर अट घातली आहे.
Ajit pawar hasn't fulfil his promise said ankita patil
social share
google news

Ankita Patil Ajit Pawar Indapur assembly constituency : "आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी आम्हाला तीन वेळा शब्द दिला होता आणि तो नंतर फिरवला. आमच्या पाठीत खंजीर खुपसला", असा गौप्यस्फोट करत हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी अजित पवारांना थेट इशारा दिला. (ankita harshvardhan patil Warns Ajit Pawar before lok sabha 2024 Election)

ADVERTISEMENT

बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी चंगच बांधला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसेच ते बोलूनही दाखवत आहे. मात्र, त्यांना महायुतीतील स्थानिक नेत्यांची साथ मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय. याला कारण ठरलंय अंकिता पाटील यांचं विधान. 

अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील

इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमधून भाजपत आले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना अजित पवारांमुळे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले. या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पण, आता हे वैर पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. 

हे वाचलं का?

अंकिता पाटलांचा अजित पवारांना इशारा

हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवारांवर गंभीर आरोप केला. अंकिता पाटील म्हणाल्या, "या आधी आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो. त्यावेळी त्यांनी (अजित पवार) तीन वेळा आम्हाला शब्द देऊन तो फिरवण्यात आला. आमची फसवणूक करण्यात आली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे यावेळस... जसं मी सांगितलं की, उमेदवार जे कुणी असतील, जाहीर होईल. आमचं विधानसभेला ते काम करणार असतील, तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू", असं अंकिता पाटील म्हणाल्या. 

अंकिता पाटील यांच्याबरोबरच हर्षवर्धन पाटील यांचे सुपूत्र राजवर्धन पाटील यांनीही विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट केले. "जे काय आम्ही चालू केलं आहे, काही लोकांना हा गैरसमज पसरवला जातोय की आम्ही आता दिल्लीमध्ये भाऊंना (हर्षवर्धन पाटील) पद मिळालं आहे. विधानसभेचं काय? मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की, 2024 ची विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत", असं ते म्हणाले. 

ADVERTISEMENT

इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा पेच

इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे 2019 मध्ये निवडून आले आहेत. ते सध्या अजित पवारांसोबत आहेत. पण, आता हर्षवर्धन पाटील निवडणूक लढवणार, हे स्पष्ट करण्यात आल्याने अजित पवारांना दत्ता भरणे यांच्यासाठी तडजोडी कराव्या लागणार आहे. मात्र, हा पेच अजित पवारांसमोर निर्माण झाला आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT