अमित शाहांसमोरच भर सभागृहात Asaduddin Owaisi नी फाडला 'तो' कागद, असं काय होतं त्यात?
Waqf Amendment Bill: वक्फ (संशोधन) विधेयक 2024 हे लोकसभेत समंत झालं आहे. पण याच दरम्यान MIM चे खासदार ओवेसी यांनी याच विषयावर चर्चा सुरू असताना विधेयकांची कागदं फाडली.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: लोकसभेत बुधवारी रात्री उशिरा वक्फ (संशोधन) विधेयक 2024 वर 12 तासांहून अधिक काळ चाललेल्या जोरदार चर्चेनंतर हे विधेयक बहुमताने मंजूर झाले. या चर्चेदरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत वक्फ संशोधन विधेयकाची प्रत प्रतिकात्मकरीत्या फाडली. या कृतीमुळे संसदेत मोठा गदारोळ झाला आणि विधेयकावरून सरकार व विरोधकांमधील संघर्ष तीव्र झाला.
ओवैसी यांनी विधेयक का फाडलं?
असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ संशोधन विधेयकाला तीव्र विरोध दर्शवताना ते "असंवैधानिक" आणि "मुस्लिमविरोधी" असल्याचा आरोप केला. त्यांनी लोकसभेत आपल्या भाषणात म्हटलं, "हा कायदा मुस्लिमांना अपमानित करण्याचा आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करण्याचा हेतू ठेवतो. मी महात्मा गांधी यांचा दाखला देतो, ज्यांनी अन्यायकारक कायद्याला नाकारलं होतं. त्याचप्रमाणे मी हा कायदा फाडतो." असं म्हणत ओवैसी यांनी विधेयकाची प्रत फाडून आपला विरोध नोंदवला आणि नंतर ते संसदेची कार्यवाही सोडून बाहेर पडले.
हे ही वाचा>> Waqf amendment bill: हे वक्फ बिल नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्प्या भाषेत समजून घ्या
त्यांच्या मते, हे विधेयक संविधानाच्या अनुच्छेद 25 आणि 26 चे उल्लंघन करते, जे धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार देतात. ओवैसी यांनी असा दावा केला की, या विधेयकामुळे वक्फ मालमत्तांवर सरकारी हस्तक्षेप वाढेल आणि मुस्लिम समुदायाच्या धार्मिक अधिकारांवर गदा येईल.
त्यांनी पुढे म्हटलं, "या विधेयकात जिल्हाधिकाऱ्यांना वक्फ मालमत्तांवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत, ज्यामुळे मशिदी आणि दर्ग्यांसारख्या पवित्र स्थळांवर कब्जा होऊ शकतो."










