Nanded : अशोक चव्हाणांनी काँग्रेसला दिला मोठा हादरा, नांदेडमध्ये तब्बल 55...

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

काँग्रेसला नांदेडमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. काँग्रेसच्या तब्बल 55 हून अधिक माजी नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला नांदेडमध्ये मोठा झटका बसला आहे.
ashok chavan 55 former corporator join bjp nanded maharashtrati politics
social share
google news

Ashok chavan Supporter 55 former corporator join bjp :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये जाहिर प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर लगेचच चव्हाणांना भाजपने राज्यसभेवर पाठवले होते. या सर्व घडामोडीनंतर पहिल्यांदाच अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी नांदेड दौरा केला होता. या दौऱ्यानंतर आता काँग्रेसला नांदेडमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. काँग्रेसच्या तब्बल 55 हून अधिक माजी नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला नांदेडमध्ये मोठा झटका बसला आहे. (ashok chavan supporter 55 former corporator join bjp nanded maharashtra politics) 

ADVERTISEMENT

अशोक चव्हाण यांनी एक्स या सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्याचसोबत चव्हाणांची या 55 नगरसेवकांसोबतचा फोटोही शेअर केला आहे. 

हे ही वाचा : Raj Thackeray : 'शरद पवारांना आज रायगड आठवला'

अशोक चव्हाणांचे ट्विट जसंच्या तसं 

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे 55 हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत करतो.

हे वाचलं का?

अशोक चव्हाण काय म्हणाले? 

जी मंडळी विकासासोबत आहेत ती भाजपसोबत आणि तिच लोकं माझ्यासोबतही असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये केलेल्या दौऱ्यात केला. भाजप म्हणजे विकास आहे. त्याला नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची साथ लाभली आहे. त्यामुळे आता नांदेडचाही विकास होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट, कारण काय?

अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नांदेडमध्ये आले. यावेळी नांदेड विमानतळापासून घरापर्यंत चव्हाण यांची मिरवणूकही मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. फटाके आणि ढोल ताश्याच्या गजरात अशोक चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून मी भारावून गेल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली होती. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT