“तुझ्यासारख्या गिधाडाला…”; जितेंद्र आव्हाड-चित्रा वाघ यांच्यात ‘राजकीय दंगल’
सोशल मीडियावर औरंगजेबाबद्दल पोस्ट टाकल्याची झळ कोल्हापूरला बसली. दगडफेक, लाठीचार्ज, अश्रुधुरांचे नळकाडे आणि शहरात दंगल झाली. सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात ‘ट्विट’वार रंगलं.
ADVERTISEMENT

Aurangzeb post kolhapur : सोशल मीडियावर औरंगजेबाबद्दल पोस्ट टाकल्याची झळ कोल्हापूरला बसली. दगडफेक, लाठीचार्ज, अश्रुधुरांचे नळकाडे आणि शहरात दंगल झाली. या दंगलीची कारणमीमांसा सुरू असताना दुसरीकडे राजकीय दंगल बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात ‘ट्विट’वार रंगलं. याची सुरूवात कशी झाली तेच समजून घेऊयात.
कोल्हापुरातील दंगलीवरून मविआ नेत्यांकडून टीका झाली. या टिकेला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, “सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली… आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की, त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही. पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय. अशा विकृतींना वेळीच आवर घाला आणि यांना येरवड्याच्या रूग्णालयात दाखल करा.”
जितेंद्र आव्हाडांची टीका
“ताई मी कुठलीही शिवी दिली नाही. फक्त मला munmy कुणाची तोंड उघडायला लावू नका. मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे. तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है. हमाम मै सब नंगे है, Baपूआर्मस्ट्राँग. आठवत असेल ना? ह्या पुढे स्वभावाप्रमाणे वागीन एंटी चेम्बरमधले ‘विनोद’ आत्ता बस. आपण खूप खालच्या पातळी वार जाऊन बोलता. माझा स्वभाव आपल्याला माहीत आहे. मी सहन करतो. पण, मला त्यानी बोलावे ज्याचे हात स्वछ आहे. अजून खूप बोलू शकतो. बहिणीला संभाळून घेत आलो, पण…”, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला.
चित्रा वाघांचं प्रत्युत्तर
“म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय. तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय.”