ना करुणा मुंडे ना अभिजीत बिचुकले...बारामतीत दुसऱ्या क्रमांकाची मतं कोणी मिळवली?
Baramati Vidhansabha By Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी दणदणीत विजय मिळवला असून, त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मते कोणाला मिळाली? हे जाऊन घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ना करुणा मुंडे ना अभिजीत बिचुकले...
बारामतीत दुसऱ्या क्रमांकाची मतं कोणी मिळवली?
Baramati Vidhansabha By Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी सहानुभूतीची लाट होती. यामुळेच त्यांनी तब्बल 2,18,930 इतकी विक्रमी मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत चर्चेत असलेले अनेक चेहरे रिंगणात असताना सुनेत्रा पवार यांच्या मताधिक्यापुढे इतर सर्व उमेदवारांचा निभाव लागला नाही. बारामतीच्या मतदारांनी सुनेत्रा पवार यांच्यावर दाखवलेला हा विश्वास त्यांना देशात विक्रमी मतांनी निवडून आणणारा ठरला आहे.
अपक्ष उमेदवारांची मतांसाठी धडपड
या पोटनिवडणुकीत नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र मतदारांनी त्यांना पूर्णपणे नाकारल्याचे दिसून येत आहे. अपक्ष उमेदवार म्हणून नशीब अजमावणारे अभिजीत बिचुकले यांना केवळ 332 मते मिळवता आली, तर करुणा मुंडे यांच्या पारड्यात केवळ 300 मते पडली. या दोन्ही उमेदवारांना मिळालेली मते पाहता, बारामतीच्या राजकारणात असो अथवा कुठल्याही मतदारसंघात असो... केवळ सोशल मीडियावर चर्चेत राहून मते मिळवता येत नाहीत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारांना मिळालेली एकूण मते....
1) सुनेत्रा पवार यांना मिळालेली एकूण मते 2,18,930









