Lok Sabha election 2024 : भाजपला मिळाला नवा मित्र, कर्नाटकात बदलणार समीकरणं
NDA, BJP-JDS Alliance News marathi : भाजप आणि जेडीएसमध्ये जवळपास युती झाली आहे. जेडीएसने भाजपकडे लोकसभेच्या पाच जागा मागितल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकात भाजपला नवा मित्र मिळाला आहे.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election 2024 BJP : लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांची चाचपणी करण्याचा आणि नव्या पक्षांना जोडण्याचे प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधी बाजूने सुरू आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी आघाडी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (INDIA) या दोन्ही आघाड्या आपापला विस्तार करण्याकडे लक्ष देत आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने कर्नाटकात नवा डाव टाकला आहे. (What will be the equation if BJP-JDS come together?)
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. या दक्षिणेतील बालेकिल्ल्यात भाजप 2019 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्ष (bjp) आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.
इंडिया टुडेचे नागार्जुन यांच्या रिपोर्टसार, जेडीएस प्रमुख एच.डी. देवेगौडा यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची युतीसंदर्भात भेट घेतली. जेडीएससोबत युती करण्यासंदर्भात भाजपने तत्त्वत: सहमती दर्शवली आहे.
जेडीएससोबत युती… येडियुरप्पा काय म्हणाले?
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी जेडीएससोबतच्या युतीच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, “देवेगौडाजी पंतप्रधानांना (नरेंद्र मोदी) भेटले याचा मला आनंद आहे आणि त्यांनी आधीच चार जागा निश्चित केल्या आहेत. मी त्यांचे स्वागत करतो.”