अजित पवार-छगन भुजबळांमध्ये शिंदेंसमोरच ‘जुपंली’; ‘त्या’ बैठकीत काय घडलं?
Ajit Pawar-chhagan bhujbal News Marathi : ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्येच वाद झाला. छगन भुजबळ यांनी अजित पवारांना मोठ्या आवाजात सुनावले.
ADVERTISEMENT
Ajit Pawar Chhagan Bhujbal News in marathi : आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकाच राजकीय गटातील दोन नेत्यांमध्ये जुंपली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. याला भुजबळांनीच दुजोरा दिला आहे. ‘अजित पवार यांच्याशी मी मोठ्या आवाजात बोललो. दोन भावांमध्ये जशी चर्चा होते, तशी चर्चा झाली’, असं ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये नेमका खटका का उडाला हे अखेर समोर आलंय. y
ADVERTISEMENT
राज्यात विविध समाजाच्या आरक्षणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्रे देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केलीये. याला ओबीसी समुदायातून विरोध केला जात आहे. अशातच शनिवारी ओबीसी आरक्षणासंदर्भातील बैठक मुंबईत झाली.
राज्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्ग आणि भटके-विमुक्त समाजातील संघटनांसोबत विविध मागण्यांसंदर्भात बैठक आज पार पडली. यावेळी माझ्यासह उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, अन्न व नागरी पुरवठा मंत्री @ChhaganCBhujbal, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री… pic.twitter.com/cU1iOhp1z4
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 29, 2023
हे वाचलं का?
छगन भुजबळ-अजित पवारांमध्ये नेमकं काय घडलं?
झालं असं की, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली गेली आहे. यावर बैठकीत चर्चा झाली. ओबीसी प्रवर्गातून मराठा कुणबी समाजाला आरक्षण देणार नाही, असं सरकारने स्पष्ट केले. यावेळी छगन भुजबळ यांनी ओसीबी संदर्भातील आकडेवारी मांडली. त्यावरून अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले.
हेही वाचा >> Aditya Thackeray : जपान दौऱ्यांवरून फडणवीसांना लक्ष्य, ‘आदू बाळा’… म्हणत शेलारांची बोचरी टीका
छगन भुजबळ यांनी शासकीय नोकरभरतीमध्ये ओबीसी आणि मराठा समाजाची टक्केवारी कशा पद्धतीने घटत आहे यांची आकडेवारी मांडली. मात्र, छगन भुजबळ यांनी मांडलेली आकेडवारी खरी नाही. असेल तर दाखवून द्यावी, असे आव्हानच अजित पवारांनी भुजबळांना दिले. त्यानंतर छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
छगन भुजबळ म्हणाले, ‘अजित पवारांशी मोठ्या आवाजात बोललो’
बैठकीत झालेल्या या घटनेला छगन भुजबळांनी दुजोरा दिला आहे. छगन भुजबळ नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, “अजित पवारांशी मी मोठ्या आवाजात बोललो. दोन भावांत जशी चर्चा होते, तशी चर्चा झाली. पराचा कावळा करण्याचे कारण नसून, राईचा पर्वत केला जात आहे.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> वसुंधरा राजेंना भाजपने शोधला पर्याय! कोण आहेत महाराणी दिया कुमारी?
भुजबळ पुढे असेही म्हणाले की, “सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मी गायकवाड आयोगाचा हवाला देत ओबीसी आरक्षणाची आकडेवारी सांगितली. आरक्षणानुसार नोकरीतील अनुशेष भरून काढण्याची मागणीही केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसलेल्या सचिवांनी अशी माहिती नसल्याचे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी अशी काही माहिती नाही, ती सत्य नाही असं सांगितलं. त्यामुळे मी माझा मुद्दा मोठ्या आवाजात मांडला.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT