CM एकनाथ शिंदेंनी खुणावलं… देवेंद्र फडणवीसांनी तिथेच दिला नकार, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

CM Eknath Shinde vs Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अद्यापही नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पालघरमध्ये नेमकं काय घडलं ते सविस्तरपणे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

CM Eknath Shinde vs Devendra Fadnavis: It can be seen that there is still resentment between Eknath Shinde and Devendra Fadnavis bjp shiv sena advertisment
CM Eknath Shinde vs Devendra Fadnavis: It can be seen that there is still resentment between Eknath Shinde and Devendra Fadnavis bjp shiv sena advertisment
social share
google news

Maharashtra Political News: हुसैन मोहम्मद, पालघर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात अद्यापही धुसफूस सुरू असल्याचं दिसून येत आहे. मंगळवारी (13 जून) शिवसेनेबाबत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंवर नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, आपण नाराज नाही तर कानाच्या दुखण्यामुळे दौरे रद्द केल्याचं फडणवीसांकडून सांगण्यात आलं होतं. असं असलं तरी आजही पालघरमध्ये (Palghar) एक अशी घटना घडली की, ज्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (cm eknath shinde dcm devendra fadnavis bjp shiv sena advertisement palghar cm car maharashtra political news)

CM शिंदेंनी खुणावलं, पण फडणवीसांनी…

त्याचं झालं असं की, जाहिरात प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबत जाहीर कार्यक्रमांना टाळलं होतं. पण आज (15 जून) म्हणजेच दोन दिवसानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांसोबत एकत्र एका हेलिकॉप्टरने पालघरमध्ये आले.

पालघरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिथे देवेंद्र फडणवीस हे शिंदेंसोबतच एकत्र आले. पण हेलिकॉप्टरमधून उतरताच असं काही झालं की, पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पालघरमध्ये हेलिकॉप्टर एकत्रच आले. पण कार्यक्रम स्थळावर मात्र दोघेही वेगवेगळ्या गाडीने गेले.

खरं तर मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीसांना त्यांच्या सोबत त्यांच्याच गाडीतून जाऊयात असं हातानेच खुणावलं. पण फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेंना तिथेच त्यांना नाही सांगितलं आणि ते थेट त्यांच्यासाठी जी गाडी तयार ठेवली होती त्याकडे वळाले. त्याच स्वतंत्र गाडीने फडणवीस हे कार्यक्रम स्थळी रवानाही झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp