Ratan Tata यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही, असा माणूस...: राज ठाकरे
Ratan Tata Death: उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. अत्यंत समर्पक शब्दात राज ठाकरेंनी टाटांबद्दल त्यांच्या भावना मांडल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रतन टाटा यांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

राज ठाकरे आणि रतन टाटा यांचे वैयक्तिक संबंध होते अत्यंत जिव्हाळ्याचे

राज ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केली टाटांबद्दलची पोस्ट
Raj Thackeray and Ratan Tata: मुंबई: भारतातील प्रतिथयश उद्योजक आणि सहृदयी व्यक्तीमत्व अशी रतन टाटा यांची ओळख आहे. त्यांच्या निधनाने फक्त टाटा समूहच नाही तर देशाचीही हानी झाली आहे. रतन टाटा हे सर्वार्थाने दिग्गज होते मात्र तरीही त्यांनी कायमच आपले पाय जमिनीवर ठेवून उद्योग क्षेत्रात भरारी मारली. त्यामुळेच त्यांच्या निधनाने आज भारतातील प्रत्येक व्यक्ती हळहळत आहे. असं असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही टाटांबद्दल सोशल मीडियावर अगदी भरभरून लिहलं आहे. (despite being rich ratan tata never showed off his wealth raj thackeray expressed his sentiments)
रतन टाटा आणि राज ठाकरे यांच्या वैयक्तिक पातळीवर बरंच सख्य होतं. त्यामुळेच टाटांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ज्यामध्ये त्यांनी एक गोष्ट स्पष्टपणे म्हटली आहे की, 'रतन टाटा यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही...'
हे ही वाचा>> Ratan Tata Dies: रतन टाटांनी देशासाठी केलेल्या 'या' 5 गोष्टी, भारतीय कधीही नाही विसरणार!
रतन टाटांबद्दल लिहलेली राज ठाकरेंची प्रतिक्रिया जशीच्या तशी...
रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि 'टाटा' ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी.
बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं.