Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंसोबत आता युती नाहीच, कारण...", फडणवीसांचं मोठं विधान

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत भाजप युती करणार नाही, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
no Chance to alliance with uddhav Thackeray's party
social share
google news

Devendra Fadnavis on Alliance with uddhav Thackeray's Shiv Sena : बिहारमध्ये नितीश कुमार हे एनडीएसोबत आले. त्यानंतर महाराष्ट्रामध्येही उद्धव ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. पण, भाजप ठाकरेंसोबत युती करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. यामागचं कारणही फडणवीसांनी सांगितलं. (Devendra Fadnavis Says no alliance with Shiv Sena of uddhav Thackeray in future)

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत वृत्तपत्राला मुलाखत दिली. सर्वांशी तुमची मैत्री आहे. अजितदादांशी मैत्री घट्ट झाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत मैत्री घट्ट झाली आहे. मग उद्धव ठाकरेजींशी तुमची जुनी मैत्री आहेच. तर मग तेही तुमच्यासोबत येतील का? अशी काही चर्चा आहे का?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. 

या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "उद्धवजी आमच्यासोबत येण्याची कुठलीही शक्यता नाही. कोणताही चान्स नाही."

हे वाचलं का?

त्यावर नितीश कुमार येऊ शकतात, तर उद्धव ठाकरे का नाही?, असा उलट प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "याचं कारण असं आहे की, उद्धवजींनी आमच्याकरता आपली दारं बंद केली. आणि केवळ दारं बंद केली नाहीत. शेवटी काय असतं की, राजकारणामध्ये तुमचा वेगळा राजकीय अजेंडा असतो. माझा वेगळा अजेंडा असतो. राजकीय अजेंडा वेगवेगळा असू शकतो. अनेक वेळा एखाद्या राजकीय विषयावर मतभेद असतात. तर ते मतभेद आपल्याला दूर करून एकत्र येता येतं." 

"इथं एकंदरीत परिस्थिती अशी आहे की, आता आमची मनं दुखावली गेली आहेत. ज्या प्रकारे त्यांचा व्यवहार राहिला आहे. ज्या प्रकारे ते पंतप्रधानांवर टीका करतात. ज्या खालच्या स्तरावर जाऊन ते बोलतात, या सगळ्या गोष्टींनी मनं दुखावली आहेत. आणि जिथे मनं दुखावतात, तिथे आघाडी होत नाही." 

ADVERTISEMENT

"राजकीय मतभेद हे दूर करता येतात आणि आघाडी करता येते. पण, जिथे मनं दुखावलेली असतात, मनं दुरावलेली असतात. तिथे एकत्रित येणं कठीण आहे. आणि ती मनं आमची दुरावली आहेत, यात काही शंका नाही", असं उत्तर देत फडणवीसांनी ठाकरेंसोबत युती नाही स्पष्टपणे सांगितले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT