‘ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्यासोबतच..’, फडणवीसांचा तात्काळ ठाकरेंवर पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis reply udhhav thackeray on nagpur kalank maharashtra politics
devendra fadnavis reply udhhav thackeray on nagpur kalank maharashtra politics
social share
google news

Maharashtra Political Latest News : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूरचे कलंक असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली होती. फडणवीसांच्या बालेकिल्ला नागपूरात येऊन त्यांनी ही टीका केली होती. ठाकरेंच्या या टीकेला आता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कलंकीचा काविळ’ असे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या, असा सल्ला देखील फडणवीसांनी यावेळी दिला आहे. (devendra fadnavis reply udhhav thackeray on nagpur kalank maharashtra politics)

देवेंंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे कलंकीत असल्याची 8 उदाहरणे देऊन त्यांच्यावर ‘कलंकीचा काविळ’ असल्याची टीका केली आहे. ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!, हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना ‘जनाब’ संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!., वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांना म्हणतात कलंक!, वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात गळे घालणाऱ्यांना म्हणतात कलंक!, ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!, कोरोनाच्या काळात मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक! अशी अनेक उदाहरणे देऊन देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे कसे कलंकीत काविळ आहेत हे सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांनी 8 उदाहरणे देऊन उद्धव ठाकरे ‘कलंकीचा काविळ’ असल्याची टीका केली. तसेच जो स्वत: कलंकीत असतो त्याला इतरही कलंकित दिसायला लागतात. त्यामुळे ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर त्यांनी एकदा उपचार करुन घ्यावा असा सल्ला देखील फडणवीसांना दिला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस हे नागपूरला कलंक असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस आपले माननीय उप मुख्यमंत्री आहेत, त्यांची अवस्था आता विचित्रच झाली आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. काय झालंय काय नाही, काहीतरी झालंय नक्की पण सांगण्यासारखं नाही,अशी खिल्ली ठाकरेंनी उडवत फडणवीसांची एक ऑडीओ क्लिपच सभेत ऐकवली होती. या क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस ”एकवेळ अविवाहित राहणे पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही”, असे म्हणताना दिसले आहेत. ही क्लिप वाजवून ठाकरेंनी जनतेला फडणवीसांच्या त्या भूमिकेची आठवण करून दिली.तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता.त्या सगळ्या भ्रष्टाचारांना बदनाम करायचं, आरोप करायचा, त्यांच्यामागे यंत्रणा लावायचा आणि दहशतीच्या वातावरण निर्माण करायचं आणि नंतर त्यांनाच भाजपात घेऊन मंत्री करायचं अशी टीका देखील ठाकरे यांनी भाजपवर केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT