'तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा तरी घेऊन गेलात का?', दसरा मेळाव्यात शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

मुंबई तक

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. यावेळेस त्यांनी काही खोचक सवालही विचारले.

ADVERTISEMENT

did you take at least one biscuit for farmers shinde teasing question to uddhav thackeray at dussehra melava
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
social share
google news

मुंबई: शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. शेतकऱ्याच्या बांधावर जाताना तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा तरी घेऊन गेलात का? असा सवाल विचारत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला. याचवेळी त्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत कशी मदत पोहचवली हे देखील त्यांनी सांगितलं.

दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

'या शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे. शेतकऱ्यांचं दु:ख आणि अश्रू पुसण्याचं काम शिवसेना करते आहे. विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात. पण त्या फोटोच्या आतलं सामान दिसत नाही. जीवनाश्यक वस्तू, 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्या. अगदी गहू, तांदूळ, डाळ साखरपासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून ब्लँकेटपासून सगळं दिलंय.' 

'तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा तरी घेऊन गेलात का? तेवढा तरी न्यायचा होता, तेवढी तरी दानत दाखवायची होती. पण आमचे फोटो तुम्हाला दिसले.' 

'अरे तुमचे फोटो लावून आमचे कार्यकर्ते मोठ्यामोठ्या आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना. तेव्हा बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं. पण तो लावतात कार्यकर्ते.. परंतु त्याच्यावर एवढी टीका..'

हे ही वाचा>> तीस वर्ष मुंबई महापालिका ओरबाडली? सगळी माया लंडनला गेली का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

'फोटोग्राफरला काय दिसणार फोटोशिवाय. फोटोच दिसणार ना.. आणि म्हणून काही लोकं गेले, फक्त जाऊन आले नौटंकी करून.. पण आम्ही एकनाथ शिंदे जायच्या आधी मदतीचे ट्रक गेले, मदत गेली नंतर हा एकनाथ शिंदे गेला. ही आमची पद्धत आहे. पूरग्रस्त भागात साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. डॉक्टरांच्या टीम गेल्या आहेत.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp