Karnataka : डीके शिवकुमार यांचे भाकीत ठरलं खरं! 128 दिवसांपूर्वी म्हणाले होते…
कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते काँग्रेस किती जागा जिंकणार याबद्दल एक अंदाज सांगत आहे.
ADVERTISEMENT

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमताने विजय मिळवला. आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. निवडणुकीनंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला विजय मिळताना दिसला. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने कर्नाटकात काँग्रेस 122-140 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला होता. अंदाज आणि शक्यतांचे आता निकालात रूपांतर झाले आहे. याच दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते काँग्रेस किती जागा जिंकणार याबद्दल एक अंदाज सांगत आहे. (an old video of Karnataka Congress President DK Shivakumar has surfaced. In this, they are estimating the seats of Congress.)
डीके शिवकुमार यांचा हा व्हिडिओ 6 जानेवारी 2023 रोजीचा आहे. इंडिया टुडेच्या पत्रकार सुप्रिया भारद्वाज यांनी त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. सुप्रियांनी प्रश्न केला होता की, आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस किती जागा जिंकेल? त्याला उत्तर देताना शिवकुमार म्हणाले होते की, “136.”
हेही वाचा >> Karnataka : सर्वात मोठा विजय! BJP, JD(S) चे बालेकिल्ले काँग्रेसने कसे बळकावले?
13 मे रोजी आलेल्या कर्नाटक निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने 135 जागा जिंकल्या. त्यामुळे हा अचूक अंदाज लावल्याबद्दल लोक शिवकुमार यांचे कौतुक करत आहेत.
Video : …अन् निकालानंतर डी.के. शिवकुमार यांना कोसळलं रडू
सोशल मीडियावर अनेक लोक त्यांना कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत. मात्र, विधिमंडळ पक्षनेते निवडीसाठी 14 मे रोजी सायंकाळी काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे.