'WhatsApp वर इतिहास वाचू नका..' राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीवरून थेट...

मुंबई तक

Raj Thackeray aurangzeb tomb: वर इतिहास वाचू नका..' असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर टिप्पणी केली आहे. पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीवरून कोणावर केली टीका
राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीवरून कोणावर केली टीका
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (30 मार्च) गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित जाहीर सभेत एका विधानाने अनेकांचे कान टोचले आहेत. “व्हॉट्सअॅपवर इतिहास नाही वाचता येत..,” असे सांगत त्यांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या इतिहासाबाबतच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी या विधानावरून अनेकांवर निशाणा साधला आहे.

'WhatsApp वर इतिहास नाही वाचता येत.. इतिहास वाचायचा असेल तर', पाहा राज ठाकरे काय म्हणाले

'आपल्याला पडलीए औरंगजेबाची. तो बसलाय एकटाच द्राक्ष खात.. आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की उडवली पाहिजे. आता कुठून आठवलं?'

'चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरमधून उतरला की, हे उतरले. छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान तुम्हाला आता कळलं विकी कौशल मेल्यावर, अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळाला? WhatsApp वर इतिहास नाही वाचता येत.. इतिहास वाचायचा असेल तर तुम्हाला पुस्तकात डोकं घालावं लागेल.' 

हे ही वाचा>> MNS: 'कुंभमेळ्याला गेलेले लाखो लोक...', राज ठाकरेंची पुन्हा एकदा तुफान टीका

'कोणीही बडबडायला लागलंय आता इतिहासावर.. विधानसभेत देखील बोलतात. खरं तर त्यांचं काही काम नाही.. औरंगजेबावर बोलतायेत. माहितीए का तरी औरंगजेब काय प्रकरण होतं. बाहेरून आलेले सगळे लोकं.. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधला.' असं म्हणत राज ठाकरेंनी औरंगजेबाची कबर आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावरून जोरदार टीका केली. 

'300-400 वर्षांपूर्वीचा इतिहास त्यावर आपण आज भांडतोय'

पुढे राज ठाकरे असंही म्हणाले की, 'आणि मग काय सोप्पंय इतिहासमधून जातीपातीमधून तुम्हाला भिडवून द्यायला. यांना ब्राह्मणांनी साथ दिली, यांना मराठ्यांनी साथ दिली. तिकडे मराठे नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनीच केलं. हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही. त्यांना फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायचीए तेवेढंच फक्त काम आहे त्यांचं. त्यांना संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य.. तुमची माथी फक्त भडकवायची.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp