‘पाठीत खंजीर खुपसण्याचा अनुभव शरद पवारांना आला असेल’, डॉ. शालिनीताई पाटील यांची टीका
स्व. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडणाऱ्या शरद पवार यांना अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्यानंतर, पाठीत खंजीर खुपसणे काय असते याचा चांगलाच अनुभव आला असेल असा टोला माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT

स्व. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडणाऱ्या शरद पवार यांना अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्यानंतर, पाठीत खंजीर खुपसणे काय असते याचा चांगलाच अनुभव आला असेल असा टोला माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी लगावला आहे. तसेच ”जे पाप करायचे, ते येथेच फेडायचे, शरद पवार यांना या वयात पाप फेडावे लागले आहे,नियतीचा हा नियम असल्याचे शालिनीताई पाटील यांनी म्हटले आहे. (dr shalinitai patil critized sharad pawar vasant dada ncp crises maharashtra politics)
वसंतदादांचे सरकार पाडणाऱ्या शरद पवार आणि वसंतदादांमध्ये कोणतेही नाते नव्हते. पण इथे तर हे चुलते पुतणेच आहेत. ज्याला हाताला धरून राजकारणात मोठं केले, त्या पुतण्याने बंडखोरी केल्यानंतर काय होते याचा पक्का अनुभव आता पवारांना आला असेल, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या आहेत. त्यावेळी वसंतदादांना व त्यांच्या कुटुंबीयांना जो काही त्रास झाला असेल, तो स्वतःला कसा होतो, हे शरद पवार यांना अनुभवायला मिळाल्याची टीका देखीव त्यांनी यावेळी केली.
राज्यात बंडखोरीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवार यांनीच केली. वसंतदादांना त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतरही ते मुख्यमंत्री झाले, असे देखील शालिनीताई पाटील म्हणाल्या आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांना पुढे पदे दिली, पक्ष पाठीशी उभा राहिला. पण काँग्रेस पक्षाशी वेळोवेळी त्यांनी गद्दारीच केली. पण एक मात्र खरे की ते काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निशाण यावर हक्क सांगितला नाही, तो अजित पवार यांनी सांगितला, असे शालिनीताई पाटील यांनी सांगितले.
हे ही वाचा : NCP: अजितदादांना ठणकावलं; शरद पवारांचं ‘ते’ भाषण जसंच्या तसं!
शरद पवार देशपातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नेते आहेत. पण अजित पवार आता या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. ते शरद पवारांशी बरोबरी करून मोठी चूक करत आहेत. घोटाळे आणि साखर कारखान्यांच्या खरेदीच्या चौकशांमधून सुटण्यासाठीच त्यांनी काकाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे शालिनीताई पाटील यांनी म्हटले आहे.










